---Advertisement---

Video: युवराजचे ६ सिक्स ते ऐतिहासिक विजय; टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील ४ अविस्मरणीय क्षण

---Advertisement---

येत्या १७ ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलियामध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कसून सराव करायला सुरुवात केली आहे. या स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामने १७ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत. तर २२ ऑक्टोबर पासून सुपर १२ फेरीतील सामन्यांना प्रारंभ होणार आहे.

सर्वत्र टी२० विश्वचषक स्पर्धेच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. तर सोशल मीडियावर देखील टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या अनेक व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहेत. दरम्यान आम्ही तुम्हाला टी२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील अशा काही रोमांचक क्षणांबद्दल माहिती देणार आहोत, जे आजही क्रिकेट चाहत्यांना जसेच्या तसेच आठवण असतील. चला तर पाहूया याबाबत अधिक माहिती.

१)युवराज सिंगचे षटकार : 
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा पहिला हंगाम २००७ मध्ये पार पडला होता. या स्पर्धेत अनेक अशा रोमांचक गोष्टी घडल्या होत्या,ज्या आजही सर्वांना आठवण असतील. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे, युवराज सिंगचे एकाच षटकात मारलेले ६ गगनचुंबी षटकार. युवराज सिंगने हा कारनामा स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर केला होता. यासह टी -२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक पूर्ण करण्याचा पराक्रम देखील केला होता.

२) तो एक चेंडू आणि भारतीय संघाने रचला इतिहास:
आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या हंगामातील अंतिम सामन्यात भारत पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने होते. हा सामना २४ सप्टेंबर, २००७ रोजी रंगला होता. या सामन्यात पाकिस्तान संघाला विजयासाठी १५७ धावांची आवश्यकता होती. तसेच अटीतटीच्या लढतीत शेवटच्या सामन्यात पाकिस्तान संघाला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी मिस्बाह उल हकने सुरुवातीला चेंडू सीमापार करत पाकिस्तानच्या आशा उंचावल्या होत्या.

पण, पाकिस्तानला ज्यावेळी ४ चेंडूंमध्ये ६ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी जोगिंदर शर्माने टाकलेल्या चेंडूवर मिस्बाह अल हकने थर्ड मॅनच्या दिशेने चौकार मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा प्रयत्न फसला होता. कारण श्रीसंतने अप्रतिम झेल टिपला आणि भारतीय संघाने पहिल्याच टी -२० विश्वचषक स्पर्धेत जेतेपद मिळवले.

३) ब्रेथवेटची तुफान फटकेबाजी:
आयसीसी टी२० विश्वचषक २०१६ मध्ये कार्लोस ब्रेथवेटने तुफानी फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाला विजयासाठी १५६ धावांची आवश्यकता होती. दरम्यान शेवटच्या षटकात वेस्ट इंडिज संघाला विजयासाठी १९ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी कार्लोस ब्रेथवेटने ४ षटकार मारत वेस्ट इंडिज संघाला जेतेपद मिळवून दिले होते.

४)भारत – पाकिस्तान सामन्यातील सुपर ओव्हर :
सन २००७ मध्ये झालेल्या पहिल्या-वहिल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना बरोबरीत सुटला होता. त्यावेळी सुपर ओव्हर हा प्रकार नव्हता. त्यामुळे जर सामना बरोबरीत सुटला तर, दोन्ही संघातील खेळाडूंना गोलंदाजी करून चेंडू स्टंपला मारावा लागायचा.

भारतीय संघाने या सामन्यात ९ गडी बाद १४१ धावा केल्या होत्या. तर पाकिस्तान संघाला देखील १४१ धावा करण्यात यश आले होते. सामना बरोबरीत सुटल्यामुळे दोन्ही संघांना चेंडू स्टंपला मारण्यासाठी पाच – पाच संधी देण्यात आली होती. यामध्ये भारतीय संघाने ३-० ने विजय मिळवला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

“त्याला स्वार्थी म्हणणे चुकीचे, सत्य नेहमी उलटं असत”, विराटच्या भीडूचे त्याच्या टीकाकारांना प्रत्युत्तर

धवनची पुन्हा कासवगती खेळी; कारकीर्दीत इतक्यांदा ओढवलीय नामुष्की

कमी शिकलेले भारतीय खेळाडू कसे काय बोलतात फाडफाड इंग्रजी? घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---