पुणे। ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित मित्तल ब्रदर्स व हेड इक्विपमेंट प्रायोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ओम दळवी मेमोरियल वन प्लस करंडक चॅम्पियनशीप सिरीज 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात सय्यम पाटील, सर्वज्ञ सरोदे, अझलन शेख, अंशुल पुजारी या खेळाडूंनी चार मानांकित खेळाडूंचा पराभव करत आजचा दिवस गाजवला.
महाराष्ट्र पोलीस जिमखाना, औंध येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या अंशुल पुजारीने तिसऱ्या मानांकित वेदांग गायकवाडचा 6-3, 6-3 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. क्वालिफायर सय्यम पाटीलने सहाव्या मानांकित वीर चतुरचा 6-3, 1-6, 7-5 असा पराभव करून आगेकूच केली. बिगरमानांकीत सर्वज्ञ सरोदेने सातव्या मानांकित वीर गायकवाडचे आव्हान 6-0, 6-0असे सहज संपुष्टात आणले. अझलन शेखने आठव्या मानांकित शौर्य गदाडेचा 6-2, 2-6, 6-3 असा संघर्षपूर्ण पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.
मुलींच्या गटात नम्रता झंवर, ईश्वरी कारेकर, काव्या तुपे, सृष्टी सूर्यवंशी, आर्या पाठक, शिबानी गुप्ते यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(पहिली फेरी): मुले:
स्मित उंद्रे[1]वि.वि.मिहीर काळे 6-1, 6-0;
कियान पटेल वि.वि.त्रिशिक वाकलकर 6-4, 4-6, 6-3;
अवी मिश्रा वि.वि.तनिश पाटील 6-2, 1-6, 6-3;
सय्यम पाटील वि.वि. वीर चतुर[6] 6-3, 1-6, 7-5;
वीरेन चौधरी[4] वि.वि.नील देसाई 6-2, 6-2;
सर्वज्ञ सरोदे वि.वि.वीर गायकवाड[7] 6-0, 6-0;
अझलन शेख वि.वि.शौर्य गदाडे[8] 6-2, 2-6, 6-3;
अंशुल पुजारी वि.वि.वेदांग गायकवाड[3] 6-3, 6-3;
सुजय देशमुख वि.वि.प्रजीत मदिरेड्डी 4-6, 6-1, 6-1;
तनिष्क देवरे वि.वि.अहान पाटील 6-0, 6-0.
मुली:
नम्रता झंवर वि.वि.वीरा हरपुडे 6-7(6), 6-3, 6-3;
ईश्वरी कारेकर वि.वि.विवा तलरेजा 7-6(7-4), 6-1;
काव्या तुपे[6] वि.वि.सान्वी राजू 6-1, 6-2;
सृष्टी सूर्यवंशी[4] वि.वि.आयुश्री तरंगे 6-0, 6-0;
आर्या पाठक वि.वि.हर्षा देशपांडे 6-3, 6-3;
शिबानी गुप्ते वि.वि.अवनी देसाई 6-0, 6-0.
महत्त्वाच्या बातम्या –
उच्चशिक्षित भारतीय शिलेदार, ज्याची डिग्री अशी की इस्त्रो किंवा नासामध्ये लागली असती नोकरी; पण…
पहिल्या ३ सामन्यात ३० विकेट्स, ईडन गार्डनवर हॅट्रिक; मग सर्वांपुढे भारतीय संघाला केले लाजिरवाणे
‘ईडन गार्डन माझं होम ग्राउंड…’, जिथे बॅट धरायला शिकला, त्याच मैदानाबद्दल काय बोलून गेला साहा