राजकोट। भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात गुरुवारी दुसरा टी20 सामना (2nd T20I) पार पडला. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला.
भारताच्या या विजयात सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा(Rohit Sharma) आणि शिखर धवनने(Shikhar Dhawan) शतकी भागीदारी करत मोलाचा वाटा उचलला. या दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी रचली.
रोहित आणि शिखरची टी20मध्ये शतकी भागीदारी करण्याची ही चौथी वेळ होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिकवेळा शतकी भागीदारी(Most 100+ partnerships in T20Is) करण्याच्या यादीत रोहित आणि शिखरची जोडी अव्वल क्रमांकावर आली आहे.
गुरुवारी भारत-बांगलादेश संघात झालेल्या टी20 सामन्यात रोहितने 43 चेंडूत 85 धावांची खेळी केली. तर शिखर धवनने 27 चेंडूत 31 धावांची खेळी केली.
या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 153 धावा केल्या होत्या आणि भारताला विजयासाठी 20 षटकात 154 धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य भारताने 15.4 षटकात 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.
#आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिकवेळा शतकी भागीदारी करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या जोड्या –
4 वेळा – रोहित शर्मा – शिखर धवन
3 वेळा – डेव्हिड वॉर्नर – शेन वॉटसन
3 वेळा – मार्टिन गप्टिल – केन विलियम्सन
3 वेळा – रोहित शर्मा – विराट कोहली
3 वेळा – मार्टिन गप्टिल – कॉलिन मुन्रो
सचिन तेंडुलकर प्रमाणेच रोहित शर्माने टी२०त केलाय हा मोठा विक्रम!
वाचा???? https://t.co/K8P9tEfnmc ????#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @beyondmarathi #INDvBAN #TeamIndia #Cricket #RohitSharma— Maha Sports (@Maha_Sports) November 8, 2019
रोहित शर्मा बनला 'अशी कामगिरी' करणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू
वाचा????https://t.co/Si2HwCEUeO#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @beyondmarathi #INDvBAN #TeamIndia #Cricket #RohitSharma— Maha Sports (@Maha_Sports) November 8, 2019






