पुणे, 17 फेब्रुवारी 2023 – पुना क्लब लिमिटेडच्या वतीने नवव्या पुना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट 2023 स्पर्धेत साखळी फेरीत माव्हरिक्स संघाने किंग्ज संघाचा तर जेट्स संघाने अर्थ गोरिलाज संघाचा पराभव करत स्पर्धेत चौथा विजय नोंदवला.
पुना क्लब क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पुनित सामंतच्या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर जेट्स संघाने अर्थ गोरिलाज संघाचा 17 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना पुनित सामंतच्या नाबाद 32, चिराग लिल्लाच्या 18 व रिशब बजाजच्या नाबाद 12 धावांसह जेट्स संघाने 6 षटकात 1 बाद 63 धावा केल्या. 63 धावांच्या आव्हानाचा सामना करताना प्रात्स , रिशब बजाज व पुनित सामंत यांच्या अचूक गोलंदाजीने अर्थ गोरिलाज संघाचा डाव 6 षटकात 6 बाद 46 धावांत रोखत संघाला विजय मिळवून दिला.
किरण देशमुखच्या नाबाद 36 धावांच्या बळावर माव्हरिक्स संघाने किंग्ज संघाचा सर्व 8 गडी राखून पराभव करत स्पर्धेत चौथा विजय नोंदवला. आर्यमान पिल्लेच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर वॉरिअर्स संघाने सेलर्स संघाचा 7 गडी राखून तर राजेश बनसोडेच्या नाबाद खेळीच्या बळावर टायफून्स संघाने जॅग्वार्स संघाचा 7 गडी राखून पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
जेट्स: 6 षटकात 1 बाद 63 धावा(पुनित सामंत नाबाद 32(18,1×4,2×6), चिराग लिल्ला 18(11,2×4), रिशब बजाज नाबाद 12(7), दिव्यांमशू सेहगल 1-4) वि.वि अर्थ गोरिलाज: 6षटकात 6 बाद 46धावा(अर्जुन मोटाडू 14(12), प्रात्स 2-7, रिशब बजाज 1-5, पुनित सामंत 1-6) सामनावीर- पुनित सामंत, जेट्स संघ 17 धावांनी विजयी.
किंग्ज: 6 षटकात 3 बाद 61 धावा(अधिश शहा नाबाद 40(21, 2×4,2×6), तुषार 1-5) पराभूत वि माव्हरिक्स: 4.2 षटकात बिनबाद 62 धावा (किरण देशमुख नाबाद 36(12, 3×4,3×6), सर्वेश मुथा नाबाद 25(14,3×4, 1×6) सामनावीर- किरण देशमुख, माव्हरिक्स संघ 8 गडी राखून विजयी
सेलर्स: 6 षटकात 3 बाद 63 धावा(अश्विन लोखंडे 30(12, 4×6), झमिर 13(9), अरूण खट्टर 1-7, आर्यन मेहता 1-13) पराभूत वि वॉरिअर्स- 5.3 षटकात 1 बाद 65 धावा(आर्यमान पिल्ले नाबाद 38(21, 4×4,1×6), आरव विज 13(5, 3×4),अरूण खट्टर नाबाद 11(8), विमल हंसराज 1-11) सामनावीर- आर्यमान पिल्ले, वॉरिअर्स संघ 7 गडी राखून विजयी
जॅग्वार्स: 6 षटकात 4 बाद 61 धावा(अमिक के 19(14,1×4, 1×6), अभिषेक ताम्हाणे 11, मनप्रित 11, क्रिश शहा 1-7, धवल गुंडेचा 1-10) पराभूत वि टायफून्स: 5.4 षटकात 1 बाद 62 धावा (राजेश बनसोडे नाबाद 30(17, 1×4,2×6), अश्विन शहा 17(11, 1×4,1×6), क्रिश शहा नाबाद 10(7), अभिषेक ताम्हाणे 1-10) सामनावीर- राजेश बनसोडे, टायफून्स संघ 7 गडी राखून विजयी.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रीय नौकानयन । लष्कराच्याच दोन संघांत अंतिम झुंज
टी20 विश्वचषकातून टीम इंडियाची एक्झिट! सेमी-फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध निसटता पराभव, हरमनची झुंज अपयशी