इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. ज्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. परंतु बीसीसीआय आणि आयपीएल कमिटीच्या अथक प्रयत्नांमुळे ही स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील येत्या १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये पार पडणार आहेत. या स्पर्धेसाठी संघांनी तयारी करायला सुरुवात केली आहे. तत्पूर्वी बीसीसीआयने असा काही निर्णय घेतला आहे, ज्यामुळे संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
बीसीसीआयने सर्व संघांना २० ऑगस्टपर्यंत आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यास सांगितले आहे. तसेच सर्व संघाच्या चिंतेत वाढ होण्याचे कारण असे की, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळणार की नाही? याची माहिती दिली नाहीये. कोरोनाची भिती पाहता आणि द्विपक्षीय मालिकेचे वेळापत्रक ठरलेले असल्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आयपीएल देशातील खेळाडू आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उपलब्ध नसतील, असे स्पष्ट केले होते.
एका फ्रँचाइजीच्या अधिकाऱ्याने म्हटले की, “आम्हाला २० ऑगस्टपर्यंत संघातील खेळाडूंची अंतिम यादी जाहीर करायची आहे. परंतु आम्हाला खात्री नाही की, सर्व परदेशी खेळाडू या स्पर्धेत सहभाग घेतील. आम्ही खेळाडूंसोबत चर्चा करत आहोत. सकारात्मक बाब म्हणजे टी-२० विश्वचषक स्पर्धा देखील युएईमध्येच होणार आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, सर्व खेळाडू स्पर्धा खेळण्यासाठी येतील. अजूनही आम्ही त्यांच्या अंतिम निर्णयाची वाट पाहत आहोत.” (Franchises in trouble as bcci sets August 20 as deadline for last date of squad submission)
धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ हा एकमेव संघ आहे, ज्यांच्याकडे संपूर्ण संघातील खेळाडूंची यादी आहे. तसेच राजस्थान रॉयल्स संघाच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. कारण जोस बटलर आणि बेन स्टोक्स खेळणार की नाही? याबाबत कुठलीही माहिती मिळाली नाहीये. तसेच या स्पर्धेचा सराव करण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ युएईला रवानाही झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सचिन अन् द्रविडच्या पावलावर पाऊल ठेवत कोहली पुढे जातोय,’ विरोधी संघातून कौतुक
एकच नंबर भावा! चेंडू पकडण्यासाठी दर्शकाची कमालीची कसरत, खुर्चीवरुन खाली पडूनही टिपला झेल
“विराटने सात वर्षांपूर्वी केलेला नंबर वन बनण्याचा संकल्प”, माजी प्रशिक्षकाने केला खुलासा