महाराष्ट्रात गुणवंत क्रिकेटपटूंची कमी नाही. पण या खेळाडूंना आणि गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी अपेक्षित व्यासपीठ मिळतेच असे नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यावर्षीपासून आपली एमपीएल स्पर्धा पुन्हा सुरू करत आहेत. स्पर्धेत एकूण सहा संघ खेळणार चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी एमसीएकडून येत आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने एमपीएल 2023 (MPL 2023) चे सर्व सामने प्रेक्षकांसाठी मोफत केले आहेत. म्हणजेच पुण्यातील एमसीएस स्टेडियमवर जाऊन चाहते विनामूल्य या सामन्यांचा आनंद घेऊ शकतात. 15 जून रोजी या स्पर्धेचा पहिला सामना खेळला जाणार आहे. तत्पूर्वी मैदानात अमृता खानविलकर हिच्या लाईव्ह परफॉर्मन्स आणि स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडेल. उद्घाटन सोहळ्यासाठीही सर्वांना मैदानात मोफत प्रवेश आहे. चाहते घरबसल्या या स्पर्धेचा आनंद डीडी स्पोर्ट्स चॅनलवर घेऊन शकतात.
एमपीएलचे सामने आणि वेळा
1. 15 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
2. 16 जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (दुपारी- 2 ते 5.20)
3. 16 जून- रत्नागिरी जेट्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
4. 17 जून- कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
5. 18 जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (दुपारी – 2 ते 5.20)
6. 18 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
7. 19 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
8. 20 जून- सोलापूर रॉयल्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (दुपारी- 2 ते 5.20)
9. 20 जून- रत्नागिरी जेट्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
10. 21 जून- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
11. 22 जून- छत्रपती संभाजी किंग्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (दुपारी – 2 ते 5.20)
12. 22 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
13. 23 जून- सोलापूर रॉयल्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)
14. 24 जून- पुणेरी बाप्पा विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (दुपारी – 2 ते 5.20)
15. 24 जून- कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)
16. 26 जून- क्वालिफायर 1
17. 27 जून- एलिमिनेटर
18. 28 जून- क्वालिफायर 2
19. 29 जून- अंतिम सामना
महत्वाच्या बातम्या –
कुस्ती महासंघाच्या निवडणूकीची घोषणा! ‘या’ तारखेला पार पडणार मतदार आणि निकाल
ASHES 2023 । नेथन लायन बनणार ‘एलिट’ क्लबचा मेंबर! करणार मोठा विक्रम