भारतात सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली व्यस्त आहे. तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून यंदा खेळाडू म्हणून फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. दरम्यान, त्याने नुकतीच एक मुलाखत दिली. ज्यात त्याने त्याच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे काय याचे एक चित्र काढून दाखवले आहे.
नुकताच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) विराटच्या (Virat Kohli) मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो दानिश सैत जो बेंगलोर फ्रँचायझीसाठी मिस्टर नॅग्सची (Mr Nags) भूमीका निभावतो, त्याला मुलाखत देताना दिसत आहे. या मुलाखतीदरम्यान विराटला एक पेपर आणि पेन देण्यात आला आणि त्याला सांगण्यात आले की, त्याच्यासाठी स्वातंत्र्याचा अर्थ काय हे चित्र काढून दाखव.
त्यावेळी विराटने त्या पेपरवर डोंगर काढले, तसेच डोंगरातून वाहत येणारी नदी काढली. त्याचबरोबर त्याने एक छोटे घर आणि तीन व्यक्ती काढले आहेत. विराटने हे चित्र का काढले, याचेही स्पष्टीकरण दिले आहे.
विराटने स्पष्टीकरण देताना सांगितले की, ‘माझ्यासाठी स्वातंत्र्याचा अर्थ आम्ही तिघे (तो स्वत:, त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि त्यांची मुलगी वामिका). डोंगरांमध्ये नदीकिनारी आमचे घर असावे.’
विराटने या मुलाखतीदरम्यान बेंगलोरचा नवा कर्णधार फाफ डू प्लेसिसचेही कौतुक केले. तसेच त्याने असेही सांगितले की, तो त्यांच्यावर होणाऱ्या टीकांकडे दुर्लक्ष करतो.
Interview of the year! Catch Virat Kohli in a relaxed, honest and fun avatar, even as Mr. Nags tries to annoy him just like he’s done over the years. 😎🤙
Tell us what the best moment from this interview was for you, in the comments section. 👨💻#PlayBold #IPL2022 #RCB #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/vV6MyRDyRt
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 11, 2022
विराटची आयपीएल २०२२ मध्ये निराशाजनक कामगिरी
आयपीएल २०२२ मध्ये विराटची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्याने आत्तापर्यंत १२ सामने खेळले असून १९.६४ च्या सरासरीने २१६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या केवळ एका अर्धशतकाचा समावेश आहे. तसेच तो या आयपीएल हंगामात ३ वेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे, म्हणजेच पहिला चेंडू खेळताना बाद झाला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
नशीब असावे तर असे! चहलच्या एकाच षटकात वॉर्नरला एक-दोन नव्हे, तर चक्क तीनदा जीवदान
वॉर्नरची आयपीएलमधील ‘या’ विक्रमात विराट, शिखरशी बरोबरी, आता केवळ रैना आहे पुढे