महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व नाशिक जिल्ह्या कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जय श्री रेणुका फाउंडेशन व समस्त ग्रामस्थ शिंदे गाव यांच्या विद्यमाने आयोजित भव्य राज्यस्तरीय पुरुष गट आमंत्रित कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे.
वंदनीय हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने शिंदे गाव, मराठी शाळेच्या मैदानात राज्यस्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेचे २२ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पालघर, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव, रायगड आणि नाशिक अश्या १० जिल्ह्यातील यास्पर्धेत आमंत्रीत १८ पुरुष संघ सहभागी होणार असून त्याचं ६ गटात विभाजन करून सुरुवातीला साखळी सामने खेळवण्यात येतील. त्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीपासून सामने खेळवण्यात येतील.