ऍडलेड येथे झालेल्या टी20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताला 10 गडी राखून पराभूत केले. यासह इंग्लंडने तिसऱ्यांदा टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. इंग्लंडच्या या विजयाचे नायक सलामीवीर जोस बटलर व ऍलेक्स हेल्स ठरले. तीन वर्षांपूर्वी इंग्लंड क्रिकेटमधील खलनायक म्हणून समोर आलेल्या हेल्सने उपांत्य फेरी तसेच या संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी करत इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
एक आक्रमक सलामीवीर म्हणून हेल्स 2017 पर्यंत इंग्लंड संघाचा मुख्य भाग होता. मात्र, सप्टेंबर 2017 मध्ये बेन स्टोक्ससह त्याने पब बाहेर एका व्यक्तीला मारहाण केलेली. संपूर्ण चौकशीनंतर त्याच्यावर सहा सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. हे प्रकरण मिटल्यानंतर 2019 मध्ये त्याच्या कारकिर्दीवर एक काळा डाग लागला. एप्रिल 2019 मध्ये उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी तो दोषी आढळला. यानंतर तत्कालीन कर्णधार ओएन मॉर्गनने म्हटलेले की, त्याने संपूर्ण संघाचा विश्वासघात केला आहे. यानंतर त्याला विश्वचषक संघातून बाहेर करण्यात आले. त्याच्या अनुपस्थितीतही इंग्लंड वनडे विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला होता.
संघातून बाहेर झाल्यानंतर त्याने जगभरातील विविध टी20 लीगमध्ये आपले कौशल्य दाखवले. तो सातत्यपूर्ण कामगिरी करत राहिला. मात्र, मॉर्गन कर्णधार असेपर्यंत त्याला संघात जागा मिळाली नाही. यावर्षी मॉर्गनने संघाचे नेतृत्व सोडल्यानंतरही त्याला लगेच संघात जागा मिळाली नव्हती. पाकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतरही टी20 विश्वचषक संघात जागा न मिळाल्याने त्याने इंग्लंड क्रिकेटच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला होता. मात्र, त्याला समाधानकारक उत्तर मिळाले नव्हते. परंतु, विश्वचषक संघाची घोषणा झाल्यानंतर जॉनी बेअरस्टो दुखापतग्रस्त झाल्याने त्याचा जागी बदली खेळाडू म्हणून हेल्सची निवड केली गेली.
विश्वचषकात त्याने संघाला गरज पडेल तेव्हा आपल्या बॅटचे पाणी दाखवून दिले. न्यूझीलंडविरुद्धच्या व श्रीलंकेविरुद्धच्या करो अथवा मरो अशा स्थितीतील सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे 52 व 47 धावांच्या खेळ्या करत संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. त्यानंतर आता भारताविरुद्ध उपांत्य फेरीत जोरदार फलंदाजी करत त्याने 47 चेंडूवर 4 चौकार व 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 86 धावांचा तडाखा दिला. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी इंग्लंड क्रिकेटसाठी विलन बनलेला हेल्स आता इंग्लंडचा हिरो बनलेला दिसतो. (From Villain To Hero Story Of Alex Hales)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लवकरच काही वरिष्ठ खेळाडू रिटायरमेंट घेतील’; भारतीय दिग्गजाचे भाकीत
जोडी जबरदस्त! टीम इंडियाला चोपत बटलर-हेल्सने वर्ल्ड रेकॉर्डही केलाय