---Advertisement---

FTX Crypto Cup: प्रज्ञानानंदाने तिसऱ्यांदा हरवले विश्वविजेत्या कार्लसनला, ठरला स्पर्धेत उपविजेता

On: सोमवार, ऑगस्ट 22, 2022 2:20 PM
Praggnanandhaa
---Advertisement---

भारताचा युवा ग्रॅंडमास्टर आर प्रज्ञानानंदाने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने एफटीएक्स क्रिप्टो कप बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत विश्वक्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा मॅग्नस कार्लसनचा ४-२ असा पराभव केला आहे. प्रज्ञानानंदाने कार्लसनला लागोपाठ तीनवेळा पराभूत केले. ज्यामध्ये टायब्रेकच्या दोन फेऱ्यांचाही समावेश आहे. कार्लसनला पराभूत केले असले तरी प्रज्ञानानंदला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

मीयामीमध्ये झालेल्या या स्पर्धेत आर प्रज्ञानानंद (R Praggnanandhaa) याने नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन (Magnus Carlsen) याचा पराभव केला असला तरी तो गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याला १५ गुण तर कार्लसन १६ गुणांसह विजेता ठरला.

कार्लसन आणि प्रज्ञानानंदा यांच्यातील पहिल्या दोन फेऱ्या ड्रॉ राहिल्या. कार्लसनने तिसरी फेरी जिंकली तर भारताचा १७ वर्षाचा खेळाडू हार मानत नव्हता. त्याने चौथी फेरी जिंकत सामना टायब्रेकरपर्यंत आणला. यानंतर प्रज्ञानानंदा टायब्रेकरचे दोन्ही फेऱ्या जिंकत कार्लसनला चकित केले. गेल्या सहा महिन्यांत प्रज्ञानानंदाने तिसऱ्यांदा कार्लसन विरुद्ध विजय मिळवला आहे.

प्रज्ञानानंदा यावर्षी जबरदस्त लयीत आहे. त्याने ऑनलाईन स्पर्धेत कार्लसनला दोन वेळा पराभूत केले आहे. तसेच नुकतेच चेन्नई येथे झालेल्या चेस ऑलिपियाडमध्ये भारत ब संघाला कांस्य पदक जिंकून देण्यात महत्वाची भुमिका पार पाडली आहे.

एफटीएक्स क्रिप्टो कप बुद्धिबळ स्पर्धेतील पहिल्या चार सामन्यांमधील प्रज्ञानानंदाची विजयी घोडदौड चीनच्या क्वँग लीने थांबवली होती. त्याने प्रज्ञानानंदाचा २.५-०.५ अशा फरकाने पराभव केला होता. या पराभवाने खचून न जाता त्याने कार्लसन विरुद्ध विजय मिळवला.

प्रज्ञानानंद आणि कार्लसन यांच्यातील सामना अटीतटीचा झाला. मात्र अखेरच्या टप्प्यात कार्लसनकडून काही चुका झाल्या. त्याचा फायदा प्रज्ञानानंदाला झाला. त्याने पुन्हा एकदा चांगली खेळी करत कार्लसन विरुद्ध विजय मिळवला. तसेच कार्लसनही या स्पर्धेत क्रिस्टोफ डुडा याच्याकडून पराभूत झाला आहे. तरही कार्लसनच एका गुणाने आघाडीवर राहिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---