नेदरलॅँड्सच्या दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाने (NEDvsPAK) तीन सामन्यांची वनडे मालिका ३-० अशी जिंकली आहे. नेदरलॅंड्स रविवारी (२१ ऑगस्ट) झालेला तिसरा वनडे सामना जिंकण्याच्या जवळ आला होता. मात्र यजमानांना हा सामना अवघ्या ९ धावांनी गमवावा लागला. त्यांनी जर हा सामना जिंकला असता तर त्यांचा हा २०१०नंतरचा सर्वोत्तम विजय ठरला होता. तेव्हा नेदरलॅंड्सने बांगलादेशला ६ विकेट्सने पराभूत केले होते. पाकिस्तानने शेवटचा सामना जिंकला असला तरी हा विजय नाही तर या सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम काय बोलला हे सर्वाधिक व्हायरल होत आहे.
बाबर आझम (Babar Azam) याला सामन्यानंतर पत्रकार परिषदेत फलंदाजीविषयी विचारले होते. त्याने येथे गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीमुळे फलंदाजी करायला थोडे कठीण आहे असे म्हणाताना विरोधी संघ नेदरलॅंड्सला स्कॉटलंड, असे संबोधले.
“सुरूवातीला फलंदाजी करताना चेंडू बॅटवर बरोबर येत नव्हता. पहिल्या डावामध्ये आम्ही कमी धावसंख्या उभारली. कारण स्कॉटलंडचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होते,” असे बाबरने म्हटले आहे.
https://youtu.be/lv777VDXlgM
“आम्ही सामना जिंकलो यामुळे खूप आनंदी आहोत. संघाने चांगली कामगिरी केली आहे. विशेषकरून, नसीमने नवीन चेंडूने डेथ ओव्हर्समध्ये उल्लेखनीय गोलंदाजी केली. वसीमनेही चांगली गोलंदाजी केली,” असेही बाबरने पुढे म्हटले आहे.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. नेदरलॅंड्सच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला अधिक धावा करण्यापासून रोखून धरले. त्यामुळे पाकिस्तानने ४९.४ षटकात सर्वबाद २०६ धावा केल्या. यावेळी बाबरने ९१ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला नेदरलॅंड्सचा संघ ४९.२ षटकातच गारद झाला. त्यांनी १९७ धावा केल्या. त्यामध्ये विक्रमजीत सिंग याने ५० आणि टॉम कुपर याने ६२ धावा केल्या. मात्र नसीम शाह याने १० षटकात ३३ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.
या मालिकेत बाबरने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ३ सामन्यांत ७४च्या सरासरीने २२२ धावा केल्या आहेत. तर सर्वाधिक विकेट्स पाकिस्तानच्या नसीम शाहने घेतल्या आहेत. त्याने ३ सामन्यांत ११.१०च्या सरासरीने १० विकेट्स घेतल्या आहेत. आता पाकिस्तानचा संघ थेट एशिया कपमध्ये भारताविरूद्ध (२८ ऑगस्ट) खेळणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चहलशी संबंध बिघडल्याच्या…! धनश्रीने इंस्टा पोस्टमध्ये दिली सविस्तर माहिती
Third ODI: झिम्बाब्वेला व्हाईटवॉश देण्यासाठी भारत सज्ज, २ बदलांसह अशी आहे प्लेइंग इलेव्हन
हृदयद्रावक! क्रिकेटपटूचा रस्ते अपघातात दुर्देवी मृत्यू, चक्क ट्रेलरखाली चिरडला गेला देह