आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकतीच मागील वर्षीच्या आयसीसी पुरस्कारांची घोषणा केली. आयसीसी पुरस्कार 2022 साठी नववर्षाच्या सुरुवातीला नामांकने जाहीर करण्यात आलेली. त्यानंतर या सर्व पुरस्कार विजेत्यांची घोषणा आयसीसीने 23 जानेवारी ते 26 जानेवारी यादरम्यान केली. क्रिकेटविश्वातील सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कारांवर विविध देशांतील खेळाडूंनी आपला हक्क सांगितला. आपण त्याच सर्व पुरस्कार विजेत्यांबाबत जाणून घेऊया.
https://www.instagram.com/p/Cn35hbPJvqA/?igshid=YmMyMTA2M2Y=
आयसीसीचा वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने आपल्या नावे केला. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर त्याला मानाची सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी देण्यात आली. वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूला देण्यात येणाऱ्या रॅंचेल हेन्स-फ्लिंट ट्रॉफीवर इंग्लंडच्या अनुभवी नतालिया सिवरने नाव कोरले.
वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने आपल्या नावे केला. स्टोक्सकडे आयसीसी कसोटी संघाचे नेतृत्व देखील देण्यात आले आहे. 2022 चा सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू म्हणून पुन्हा एकदा बाबर आझमची निवड झाली. तो आयसीसी वनडे संघाचा कर्णधार देखील असेल. महिला विभागात नतालिया सिवर हीच या पुरस्काराची मानकरी ठरली. आयसीसी महिला वनडे संघाचे नेतृत्व भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हि करेल.
https://www.instagram.com/reel/Cn5_F98PyD1/?igshid=YmMyMTA2M2Y=
वर्षातील सर्वोत्कृष्ट टी20 खेळाडू हा पुरस्कार पुरुष गटात भारताच्या सूर्यकुमार यादव याने मिळवला. तर, महिला गटात ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू ताहिला मॅकग्रा ही विजेती ठरली. आयसीसी टी पुरुष संघाचे नेतृत्व विश्वविजेता कर्णधार जोस बटलर करेल. आयसीसी टी20 महिला संघाची कर्णधार म्हणून सोफी डिवाईन असेल.
इतर पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू म्हणून पुरुष विभागात दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जेन्सन याने आपली मोहर उमटवली. तर, महिला विभागात भारताच्या रेणुका सिंग ठाकूर हिला विजयी घोषित केले गेले. मागील वर्षीचे सर्वोत्तम पंच म्हणून रिचर्ड इलिंगवर्थ यांना सन्मानित केले गेले. तर, खिलाडूवृत्ती जपण्यासाठी देण्यात येणाऱ्या आयसीसी स्पिरिट ऑफ द गेम या पुरस्कारावर नेपाळचा यष्टीरक्षक आसिफ शेखने आपला हक्क सांगितला.
(Full List of ICC Awards 2022 Just On One Click)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष : क्रिकेटचा हॅरी पॉटर अर्थात न्यूझीलंडचा फिरकीपटू ‘डॅनियल व्हेट्टोरी’; जाणून घ्या त्याचे खास विक्रम
कारकिर्दीतील शेवटचे ग्रँडस्लॅम नाही जिंकू शकली सानिया मिर्झा, पराभवानंतर अश्रू अनावर