इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाचे बिगूल वाजले आहे. या हंगामाला ९ एप्रिल पासून चेन्नईमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्याने सुरुवात होणार आहे.
या आयपीएल हंगामात किंग खान अर्थात शाहरुख खानच्या मालकीचा कोलकाता नाईट रायडर्स संघ चेन्नईमध्येच सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ११ एप्रिलला पहिला सामना खेळेल. त्यांच्या या हंगामातील एकूण १४ सामन्यांपैकी ११ सामने रात्री ७.३० वाजता होतील. तर उर्वरित ३ सामने दुपारी ३.३० वाजता होतील. आजवर २०१२ आणि २०१४ मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या कोलकाताचे यावेळी तिसऱ्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरण्याचा उद्देश असेल.
यंदा सुरक्षेच्या कारणाने केवळ ६ शहरात आयपीएलचे आयोजन करण्यात आले आहे. या ६ शहरांमध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांचा समावेश होतो.
तसेच साखळी फेरी दरम्यान प्रत्येक संघ ४ ठिकाणी सामने खेळणार आहे. यादरम्यान प्रत्येक संघाला केवळ ३ वेळाच प्रवास करावा लागणार आहे. जेणेकरुन कोरोना बाबातची जोखीम कमी होईल. एवढेच नाही तर यंदा कोणताही संघ घरच्या मैदानावर सामने खेळणार नाही. प्रत्येक सामने तटस्थ मैदानांवर होणार आहेत.
आयपीएलचा हा चौदावा हंगाम यावर्षी ५१ दिवसांचा असणार आहे. ९ एप्रिल ते २३ मेपर्यंत या हंगामातील साखळी सामने पार पडतील. त्यानंतर २५ मे पासून प्लेऑफचे सामने सुरु होतील. तसेच यावर्षी आयपीएलमध्ये ११ डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) होणार आहेत. डबल हेडरच्या दिवशी दुपारचे सामने ३.३० वाजता सुरु होतील आणि संध्याकाळचे सामने ७.३० वाजता सुरु होतील.
𝗦𝗔𝗩𝗘 𝗧𝗛𝗘 𝗗𝗔𝗧𝗘 🗓️
The schedule for #IPL2021 is finally here! 🤩
We kickstart our campaign against @SunRisers on April 11 in Chennai ⏳#KKR #IPLFixtures #IPLSchedule pic.twitter.com/kh5d7WVovS
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 7, 2021
असे आहेत आयपीएल २०२१ मधील कोलकाता नाईट रायडर्सचे साखळी फेरीतील सामने-
११ एप्रिल – चेन्नई, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी ७० वाजता
१३ एप्रिल – चेन्नई, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१८ एप्रिल – चेन्नई, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, दुपारी ३.३० वाजता
२१ एप्रिल – मुंबई, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
२४ एप्रिल – मुंबई, राजस्थान रॉयल्स विरुद्ध विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२६ एप्रिल – अहमदाबाद, पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२९ एप्रिल – अहमदाबाद, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
३ मे – अहमदाबाद, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, संध्याकाळी ७.३० वाजता
८ मे – अहमदाबाद, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वाजता
१० मे – बंगळुरू, मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१२ मे – बेंगळुरू, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१५ मे – बंगळुरू, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग, संध्याकाळी ७.३० वाजता
१८ मे – बंगळुरू, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२१ मे – बंगळुरू – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वाजता
कोलकाता नाईट रायडर्स – २५ खेळाडू (८ परदेशी)
दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सुनील नारायण, इयॉन मॉर्गन (कर्णधार), पॅट कमिन्स, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, टीम सिफर्ट, शाकिब अल हसन, हरभजन सिंग, बेन कटिंग, करुण नायर, पवन नेगी, वेंकटेश अय्यर, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा
महत्त्वाच्या बातम्या-
अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेली सीएसके पटकावणार चौथे जेतेपद? पाहा ‘थाला’च्या संघाचे पूर्ण वेळापत्रक