---Advertisement---

वर्ल्डकपसाठी शाहिन ऑस्ट्रेलियाला रवाना! ट्विट करत भरली हुंकार; म्हणाला..

On: शुक्रवार, ऑक्टोबर 14, 2022 12:24 PM
shaheen
---Advertisement---

टी20 विश्वचषकाला सुरुवात होण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी, पाकिस्तान संघासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी हा दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून, तो शनिवारी (15 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत त्याने स्वतःही माहिती दिली.

शाहिन जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर पहिली कसोटी खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर त्याने मैदानावर पाऊल ठेवले नाही. आशिया चषकादरम्यान तो संघासह युएईत उपस्थित होता. मात्र, स्पर्धेच्या मध्यातून तो इंग्लंडला पुनर्वसनासाठी पोहोचला. इंग्लंडमधील प्रसिद्ध फुटबॉल क्लब क्रिस्टल पॅलेस यांच्यासह त्याने आपली ही पुनर्वसनाची प्रतिक्रिया पूर्ण केली. तेथून निघण्यापूर्वी त्याने आपल्या फिजीओंचे आभार मानताना, त्यांच्यासोबतचे छायाचित्र पोस्ट करत लिहिले,

 

‘माझ्या संपूर्ण पुनर्वसन प्रक्रियेत मदत करणाऱ्या सर्व फिजीओंचे आणि टीमचे आभार. उर्वरित हंगामासाठी संघाला शुभेच्छा. आता ऑस्ट्रेलियाला जायचे.’

शाहिनने अल्पावधीतच आपल्या धारदार गोलंदाजीने पाकिस्तान संघातील आपले स्थान पक्के केले आहे. त्याला मागील वर्षी आयसीसीचा सर्वात्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कारही मिळाला होता. मागील वर्षी विश्वचषकात पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीपर्यंत नेण्यात त्याने मोलाचा वाटा उचललेला.

पाकिस्तान संघ टी20 विश्वचषकात आपल्या मोहिमेची सुरुवात 23 ऑक्टोबर रोजी भारतीय संघाविरुद्ध करेल. मेलबर्न येथील ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हा सामना खेळला जाईल. मागील विश्वचषकात भारतीय संघाला पाकिस्तानकडून दहा गड्यांनी मोठा पराभव पत्करावा लागलेला. त्या सामन्यात शाहिनने तत्कालीन भारतीय कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा व केएल राहुल या तीनही प्रमुख फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत पाकिस्तानचा विजय सोपा केलेला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भविष्यात भारत-पाकिस्तान क्रिकेट संघ द्विपक्षीय मालिकेत आमनेसामने येतील का? घ्या जाणून
टी२० विश्वचषकातील पाच ‘सिक्सर किंग्स’; युवी दुसऱ्या स्थानी तर ‘हा’ दिग्गज अव्वल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---