---Advertisement---

तो एकतर ७०-८० धावा करतो नाहीतर काहीच नाही; शतक झळकावणाऱ्या ‘या’ फलंदाजावर गंभीरने ओढले ताशेरे

On: शुक्रवार, एप्रिल 23, 2021 3:05 PM
Gautam Gambhir
---Advertisement---

आयपीएल २०२१ मध्ये संजू सॅमसन नेतृत्व करत असलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. पहिल्या चार सामन्यांपैकी हा संघ केवळ एकच विजय मिळवू शकला. त्यामुळे संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानी दिसून येतोय. स्वतः कर्णधार संजू सॅमसन पहिल्या सामन्यातील शतकानंतर इतर तीन सामन्यात चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळेच दिग्गज माजी भारतीय सलामीवीराने त्याच्यावर ताशेरे ओढले आहेत.

संजू मानसिक समस्येशी झगडतोय
भारतीय संघाचा माजी सलामीवीर व सध्या आयपीएलमध्ये समालोचन करणारा गौतम गंभीर याने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनच्या खेळाविषयी नाराजी व्यक्त केली. एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना तो म्हणाला, “संजू प्रत्येक आयपीएल हंगामात चांगली सुरुवात करतो. यावर्षी देखील त्याने हेच केले. मात्र त्यानंतर त्याच्या खेळामध्ये अजिबात सातत्य दिसले नाही. त्यामुळे तो मागे पडत आहे.”

गंभीर पुढे म्हणाला, “संजूचे खेळात सातत्य न राखणे म्हणजे तो एखाद्या मानसिक समस्येशी झगडतोय. तो एकतर ७०-८० धावा बनवितो किंवा काहीच नाही. विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, रोहित शर्मा धावांचा पाठलाग करताना अत्यंत विचारपूर्वक आपली खेळी विणताना दिसतात. हे त्याने शिकणे गरजेचे आहे. मैदानावरील परिस्थितीनुसार देखील त्याला निर्णय घ्यायला यायला हवेत. कर्णधार म्हणून त्याच्यात सुधारणेला खूप वाव आहे.”

संजूची कामगिरी घसरली
आयपीएल २०२१ ची सुरुवात संजू सॅमसनने अत्यंत धमाकेदार केली. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ११९ धावांची खेळी केली होती. मात्र त्यानंतर पुढील तीन सामन्यात तो ४, ० व २१ अशा धावा बनवू शकला. सोबतच यावर्षी प्रथमच नेतृत्व करत असलेला संजू कर्णधार म्हणून देखील आपली छाप पाडू शकला नाही. संघाला पहिल्या चार पैकी तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मी त्याच्या शॉटचा दिवाना झालोय; ‘सिक्सर मास्टर’ असलेल्या भारतीय खेळाडूची इंग्लिश दिग्गजाला भुरळ

मानलं तुला भावा! कोरोनाशी लढा दिला, पहिला सामन्याला मुकला; आता शतक करत आयपीएलचा ‘हिरो’ बनला

बेंगलोरचा राजस्थानवर ‘रॉयल विजय’; चेन्नईला पछाडत गुणतालिकेत पुन्हा ‘या’ स्थानी झाले विराजमान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---