---Advertisement---

मी त्याच्या शॉटचा दिवाना झालोय; ‘सिक्सर मास्टर’ असलेल्या भारतीय खेळाडूची इंग्लिश दिग्गजाला भुरळ

On: शुक्रवार, एप्रिल 23, 2021 12:58 PM
---Advertisement---

आयपीएलच्या 14 व्या सत्रात आत्तापर्यंत फक्त 16 सामने खेळले गेले असून त्यामध्ये प्रत्येक संघाने आणि संघातील खेळाडूने आपापल्या परीने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करून चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्यामध्ये भारतीय युवा खेळाडूंनी तर कहरच केला आहे. त्यामध्ये एक खेळाडू असा आहे जो सहजपणे षटकार मारून गोलंदाजांना घाम फोडतो. या फलंदाजाने मागील काही वर्षात चमकदार कामगिरी करून जगभरात आपल्या नावाचा ठसा उमटवला असून यामध्ये इंग्लंडचा माजी दिग्गज क्रिकेटपटू केविन पीटरसन हेदेखील त्या फलंदाजाचे मोठे चाहते झाले आहेत.

हा 26 वर्षीय फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून यंदाच्या आयपीएल मोसमात राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करणारा संजू सॅमसन आहे. सॅमसन हा भारतीय खेळांडूंमधील सर्वात हुशार खेळाडूंपैकी एक मानला जातो. गेल्या काही वर्षांत त्याने घरगुती क्रिकेटसोबतच आयपीएलमध्येही जबरदस्त विस्फोटक फलंदाजी केली आहे. प्रत्येक आयपीएल हंगामात तो काही-ना- काही उत्कृष्ट खेळी करत असतो.

त्याचप्रमाणे या हंगामातसुद्धा त्याने दमदार शतकी खेळी करत या स्पर्धेची सुरुवात केली. या हंगामातील राजस्थानच्या पहिल्याच सामन्यात त्याने पंजाब किंग्जविरुद्ध 119 धावा फटकावल्या. त्याने साकारलेल्या या शतकी खेळीमुळे अनेकजण त्याचे चाहते झाले असून इंग्लंडचे माजी फलंदाज पीटरसन यांनीही बेटवेशी बोलताना स्वतःला संजू सॅमसनच्या खेळीचा चाहता सांगत त्याचे कौतुक केले.

कौतुक करताना ते म्हणाले की, “संजू सॅमसन मला दरवर्षी आवडतो. ज्याप्रमाणे तो वेळ घेऊन फटकेबाजी करत असतो. ते मला खूप आवडते. तसेच त्याने पंजाब किंग्जविरूद्ध ठोकलेले शतक खूप जबरदस्त होते. परंतु तो आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.”

त्याच बरोबर संजू सॅमसनला त्याच्या कामगिरीमध्ये निरंतरता ठेवण्याबाबत सल्ला देताना ते म्हणाले की, “संजू सॅमसन चांगली कामगिरी करत असून त्याला आपल्या कामगिरीत निरंतरता ठेवणे गरजेचे आहे. तो सुरुवातीला चांगली कामगिरी करता करता मध्येच एकदम खराब फॉर्मचा सामना करतो.”

मागील हंगामात संजू सॅमसनने 14 सामन्यात 26 षटकार ठोकले होते. तर त्याचप्रमाणे या वेळीही त्याने 4 सामन्यात 8 षटकार लावले आहेत. मात्र पहिल्या सामन्यात केलेल्या शतकानंतर पुढच्या तीन डावात मोठी खेळी साकारण्यात तो अपयशी ठरला आहे. परंतु त्याच्याकडे या हंगामातील अजून 10 सामने शिल्लक असून त्याला चांगली कामगिरी करून संघाला पुढे घेऊन जाण्याची संधी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘बापू आला’; कोरोनावर मात करत अक्षर पटेलचे दिल्ली संघात जोरदार पुनरागमन, पाहा खास व्हिडिओ

मोठ्या मनाचा माणूस! आधी ख्रिस गेल आणि आता देवदत्त पडीक्कल; कोहलीच्या ‘त्या’ कृत्याने चाहते भारावले

बेंगलोरचा राजस्थानवर ‘रॉयल विजय’; चेन्नईला पछाडत गुणतालिकेत पुन्हा ‘या’ स्थानी झाले विराजमान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---