भारत विरुद्ध न्यूझीलंड मधील पाचवा वन-डे सामना उद्या (3 फेब्रुवारी) खेळला जाणार आहे. ही 5 सामन्यांची वन-डे मालिका भारताने आधीच 3-1ने अशी आघाडी घेत जिंकली आहे.
या मालिकेतील पहिले तीन सामने जिंकल्यानंतर चौथ्या सामन्यात भारताला 8 विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते.
चौथ्या सामन्यात भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना सर्वबाद 92 धावा केल्या होत्या. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनी हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे खेळला नव्हता. त्याचबरोबर तो याच दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्यातही खेळू शकला नव्हता.
पण धोनी दुखापतीमधून सावरला असून तो 5व्या सामन्यात खेळू शकतो, अशी माहिती भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी दिली आहे.
उद्या होणाऱ्या पाचव्या सामन्याअगोदर न्यूझीलंडचा अष्टपैलू जिमी निशामने धोनीचे कौतुक केले आहे. यावेळी त्याने धोनीची विकेट मिळणे किती आवश्यक आहे हे देखील सांगितले आहे.
‘धोनीला बाद केल्याशिवाय तुम्ही सामना जिंकू शकणार नाही. त्यामुळे आमचे लक्ष त्याला बाद करण्यावरच असणार आहे’, असे मत निशामने मांडले आहे.
यावेळी निशामने वेलिंगटनचे मैदान हॅमिल्टन सारखेच असल्याने येथे वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळू शकते. त्यामुळे भारताच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल असेही म्हटले आहे.
धोनी यावर्षी चांगल्या लयीत खेळत असून त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या वनडेत 33 चेंडूत नाबाद 48 धावांची खेळी केली होती. तसेच त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धही तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सलग तीन अर्धशतके केली होती. या मालिकेत त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
–ISL 2018-19: चेन्नई आणि पुण्यात विजयाचा दिलासा कोण देणार ?
–तेंडुलकर-गांगुलीच्या त्या विक्रमला रोहित शर्माकडून आहे धोका
–एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी ही आहे मोठी खुशखबर