बर्मिंगहॅम। 2019 विश्वचषकात आज(30 जून) एजबस्टर्न स्टेडीयमवर इंग्लंड विरुद्ध भारत संघात आज 38 वा सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघ 338 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत आहे.
या धावांचा पाठलाग करताना भारताकडून सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे. त्याने या सामन्यात 109 चेंडूत 102 धावा केल्या आहेत. ही खेळी करताना त्याने 15 चौकार मारले आहेत. याबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे.
रोहितचे हे विश्वचषकातील चौथे शतक आहे. त्यामुळे तो विश्वचषकात सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तसेच त्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. गांगुलीनेही विश्वचषकात 4 शतके केली आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर 6 शतकांसह सचिन तेंडुलकर आहे.
गांगुलीच्या आणखी एका विक्रमाची रोहितने केली बरोबरी –
रोहित हा एका विश्वचषकात 3 शतके करणारा भारताचा दुसरा फलंदाज आहे. याआधी गांगुलीने 2003 च्या विश्वचषकात 3 शतके केली होती. तर रोहितने 2019 च्या विश्वचषकात 3 शतके केली आहेत.
तसेच रोहितने एका विश्वचषकात सर्वाधिक शतके करणाऱ्या एकूण फलंदाजांच्या यादीत गांगुलीसह मार्क वॉ आणि मॅथ्यू हेडनचीही बरोबरी केली आहे. यांनीही एका विश्वचषकात 3 शतके करण्याचा पराक्रम केला आहे. तर एका विश्वचषकात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम कुमार संगकाराच्या नावावर आहे. त्याने 2015 च्या विश्वचषकात 4 शतके केली होती.
#विश्वचषकात सर्वाधिक शतके करणारे भारतीय –
6 – सचिन तेंडुलकर
4 – रोहित शर्मा
4 – सौरव गांगुली
3 – शिखर धवन
2 – विराट कोहली / विरेंद्र सेहवाग / राहुल द्रविड
#एका विश्वचषकात सर्वाधिक शतके करणारे फलंदाज –
4 – कुमार संगकारा – 2015
3 – मार्क वॉ – 1996
3 – सौरव गांगुली – 2003
3 – मॅथ्यू हेडन – 2007
3 – रोहित शर्मा – 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–किंग कोहलीने अर्धशतकी खेळी बरोबरच केले हे खास ५ विक्रम
–इंग्लंड विरुद्ध ५ विकेट्स घेणाऱ्या शमीचा झाला या दिग्गजांच्या यादीत समावेश
–या भारतीय गोलंदाजांनी घेतल्या आहेत विश्वचषकातील एका सामन्यात ५ विकेट्स






