बर्मिंगहॅम। 2019 विश्वचषकात आज एजबस्टर्न स्टेडीयमवर इंग्लंड विरुद्ध भारत संघात आज 38 वा सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 337 धावा केल्या आहेत. तसेच भारताकडून मोहम्मद शमीने 5 विकेट घेत शानदार कामगिरी केली.
त्याने या सामन्यात 10 षटके गोलंदाजी करताना 69 धावा देत जॉनी बेअरस्टो, जो रुट, इयान मॉर्गन, जॉस बटलर आणि ख्रिस वोक्स यांना बाद केले. शमीची ही विश्वचषकातील एका सामन्यात चार किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची ही चौथी वेळ आहे.
त्यामुळे तो सर्वाधिक वेळा विश्वचषकातील एका सामन्यात चार किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. तसेच त्याने ट्रेंट बोल्ट, शेन वॉर्न आणि शाहिद आफ्रिदी या गोलंदाजांची बरोबरी केली आहे. बोल्ट, वॉर्न आणि आफ्रिदी यांनीही विश्वचषकात चार वेळा चार किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
त्याचबरोबर या यादीत अव्वल क्रमांकावर मिशेल स्टार्क असून त्याने 6 वेळा अशी कामगिरी केली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर इम्रान ताहिर असून त्याने 5 वेळी ही कामगिरी केली आहे.
शमीने याआधी 2019 विश्वचषकात अफगाणिस्तान विरुद्ध आणि विंडीज विरुद्ध चार विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याने 2015 च्या विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
सर्वाधिक वेळा विश्वचषकातील एका सामन्यात चार किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
6 – मिशेल स्टार्क
5 – इम्रान ताहिर
4 – ट्रेंट बोल्ट
4 – मोहम्मद शमी
4 – शेन वॉर्न
4 – शाहिद अफ्रिदी
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–या भारतीय गोलंदाजांनी घेतल्या आहेत विश्वचषकातील एका सामन्यात ५ विकेट्स
–राखीव क्षेत्ररक्षक रविंद्र जडेजाने घेतला जेसन रॉयचा अफलातून झेल, पहा व्हिडिओ
–विश्वचषक इतिहासात असा पराक्रम करणारा मिशेल स्टार्क पहिला गोलंदाज





