कोलकाता| भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) काही महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर होता. बुमराह आता या दुखापतीतून सावरत आहे. त्यावर आज (20 डिसेंबर) राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) बुमराहच्या फिटनेसचे मूल्यांकन केले जाईल, असे बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) म्हणाले.
यापूर्वी अशी अफवा पसरली होती की, भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज बुमराह आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) प्रमुख असलेली एनसीए संस्था बेंगळुरूमध्ये त्याची फिटनेस चाचणी घेण्यास तयार नाही.
परंतु, बुमराह त्याच्या पाठीच्या दुखापतीतून बरा होत आहे. विशाखापट्टणम येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या (Windies) दुसर्या वनडे सामन्यापूर्वी त्याने नुकत्याच भारताच्या सराव सत्रात गोलंदाजी केली होती.
“मला याची माहिती नाही. परंतु, भारतीय खेळाडूंना एनसीएमध्ये जावे लागेल,” असे पत्रकारांशी बोलताना गांगुली म्हणाला.
बुमराहने एनसीए येथे प्रशिक्षण घेण्याऐवजी खासगी प्रशिक्षकाद्वारे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे द्रविड नाराज असल्याचे म्हटले जात आहे.
26 वर्षीय बुमराह दुखापतीतून सावरल्यानंतर आयपीएलची फ्रँचायझी असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) प्रशिक्षक रजनीकांत शिवगानम (Rajinikanth Sivagnanam) यांच्याकडून मुंबई येथे प्रशिक्षण घेत आहे.
“आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचे एनसीए हे पहिले व शेवटचे केंद्र असेल. हे भारतीय क्रिकेटपटूंसाठी आहे. प्रत्येकाला एनसीएतून जाण्याची गरज आहे,” असे गांगुली म्हणाला.
“तो वर्षभर क्रिकेट खेळतो. जसप्रीतच्या मदतीसाठी एनसीएचे फिजिओ मुंबईत येऊ शकेल की नाही हेही आम्ही पाहू. आम्हाला एनसीए अंतर्गत लक्ष ठेवले पाहिजे. आम्हाला खात्री करुन घ्यायची आहे की एनसीएमध्ये सर्वोत्कृष्ट लोक उपस्थित आहेत,” असेही गांगुली म्हणाला.
तसेच गांगुली असेही म्हणाला की, तो द्रविडशी चर्चा करेल.
गांगुलीने नुकतीच एनसीएला भेट दिली होती आणि यावर्षी जुलैमध्ये तेथे त्यानी क्रिकेट प्रमुख म्हणून नेमलेल्या द्रविडशी चर्चा केली होती.
हे ४ मुंबईकर खेळाडू आयपीएल २०२०मध्ये खेळणार दिल्ली कॅपिटल्सकडून!
वाचा👉https://t.co/yAJbo8dM1t👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPLAuction2020— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019
मुंबईकर झालेल्या या खेळाडूला बुमराह म्हणतो,''तरीही तूला माझा सामना करावाच लागेल"
वाचा👉https://t.co/MBtm206gKM👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPLAuction2020— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019