इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ मध्ये नव्याने दाखल झालेल्या गुजरात टायटन्स संघाने यावेळी आपले नाव आयपीएल ट्रॉफीवर कोरले. आपल्या पहिल्याच हंगामात आयपीएल ट्रॉफी उंचावणारा गुजरात हा केवळ दुसरा संघ ठरला आहे. याआधी २००८ साली आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्सने हा कारनामा केला होता. गुजरातने आयपीएलचे विजेतेपद पटकावल्यानंतर गुजरातचे सहाय्यक प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कर्णधार हार्दिक पंड्या आणि संघाचे प्रशिक्षक आशिष नेहरा या दोघांवरही कौतुकाचा वर्षाव केला.
गॅरी कर्स्टन (Garry Kirsten) यांनी हा विजय नेहमी लक्षात राहिल, असे म्हटले आहे. कर्स्टन यांनी स्टार स्पोर्ट्सोबत बोलताना सांगितले की, “संघ लिलावात समतोल आणि खोली शोधत होतो. परंतु, सर्वात महत्त्वाचे म्हणजे अष्टपैलू खेळाडूंची निवड. आशिष नेहराने (Ashish Nehra) लिलावात अशा खेळाडूंची निवड केली जे वेगवेगळ्या भूमिका करू शकतात. आमच्याकडे ४,५,६ क्रमांकावर चांगली खेळी करू शकतात असे खेळाडू होते. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये आमची गोलंदाजी मजबूत होती आणि शेवटी एका अतिरिक्त गोलंदाजासह खेळणे संघाला महत्तवाचे ठरले.”
गॅरी कर्स्टन यांनी हार्दिक पंड्याचं (Hardik Pandya) कौतुक करताना म्हटलं की, “हार्दिक खूप नम्र आणि शिकण्यासाठी उत्सुक आहे. त्याने चांगली फलंदाजी केली आणि जबाबदारीने खेळ केला, तर त्याचा हा फॉर्म आपण आयपीएलमध्ये आतापर्यंत पाहिला नाही.”
“आशिषसोबत काम करताना खूप आनंद झाला. तो रणनीती बनवण्यात खूप चांगला आहे,” असं म्हणत कर्स्टन यांनी आशिष नेहराचे देखील कौतुक केले.
दरम्यान, २०११ मध्ये भारताने विश्वचषक जिंकला तेव्हा संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टनच होते आणि आशिष नेहरा खेळाडूच्या भूमिकेत होते. हा एक अद्भुत योगायोग आहे. यावर्षी भूमिका बदललेली दिसली. आशिषने गुजरात टायटन्समध्ये मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली आणि कर्स्टन यांनी त्याचा सहकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली.
व्हॉट्सअपवर अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करा
हेही वाचा
आयपीएल जिंकणारा हार्दिक चौथाच भारतीय कर्णधार; पाहा आयपीएल विजेत्या संघनायकांची संपूर्ण यादी
राजस्थानच्या जुन्या खेळाडूनेच केला ‘रॉयल्स’चा घात, अंतिम सामन्यात चोप चोप चोपले
बाबो! आयपीएलमधील एका बॉलची किंमत आहे तब्बल २१ लाख