---Advertisement---

त्यांनी विराटला सांगितलं होत, तुला भविष्यात चांगल्या स्तरावर पोहोचायचे असेल तर…

On: बुधवार, जुलै 15, 2020 2:29 PM
---Advertisement---

मुंबई । गॅरी कर्स्टन हे भारताचे सर्वात यशस्वी विदेशी प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ 2009 साली कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने 2011 साली दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. ग्रेग चॅपल यांच्या वादग्रस्त कारकीर्दीनंतर त्यांनी अनुभवी आणि युवा खेळाडूंचा योग्य ताळमेळ साधत संघाला एका उंचीवर नेऊन ठेवले. 

दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू गॅरी कर्स्टन यांनी विराटविषयी ‘द आरके शो’ मध्ये बोलताना म्हटले, “विराट कोहली जवळ जबरदस्त टॅलेंट होते. मात्र त्याचा तो उपयोग करत नव्हता. चांगली सुरुवात केल्यानंतर तो मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद व्हायचा. त्यावेळी मी त्याला सांगितले की जर पुढे जायचे असेल तर अनावश्यक फटका मारणे टाळ.”

ते म्हणाले, “जेव्हा विराट मला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याच्यात खूपच प्रतिभा दिसून आली. त्यावेळी तो खूपच तरूण होता. त्याच्याकडे चांगली क्षमता असतानाही तो त्याचा वापर करू शकत नव्हता.”

“मी कधीच विसरणार नाही. आम्ही श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळत होतो. त्या सामन्यात विराट कोहली शानदार फलंदाजी करत होता. तो 30 धावांवर नाबाद होता. अचानक तो मोठा षटकार मारण्याच्या नादात बाद झाला. मी त्याला सांगितलं जर तुला भविष्यात चांगल्या स्तरावर पोहोचायचा असेल तर धोकादायक चेंडू खेळणे सोडून द्यावे लागेल. त्याने माझे बोलणे मनावर घेतले आणि पुढील कोलकात्याच्या सामन्यात एक शानदार शतकी खेळी साकारली,” असे गॅरी कर्स्टन यांनी नमूद केले.

ट्रेंडिंग घडामोडी –

श्रीलंकेच्या ‘या’ गोलंदाजाचा असा एक विक्रम जो मोडणे बुमराहच काय अन्य गोलंदाजासाठीही कठीण

भारताच्या या क्रिकेट अंपायरमुळे गावात आले मोबाइल नेटवर्क

‘रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने माझे आयुष्य बदलले’, पहा कोण म्हणतंय हे…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---