---Advertisement---

‘वारसा नष्ट करायला एक मिनिट पुरेसा’, कोलकाताच्या नेतृत्व बदलानंतर गंभीरचं ट्विट व्हायरल

On: शुक्रवार, ऑक्टोबर 16, 2020 9:44 PM
---Advertisement---

आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार दिनेश कार्तिकने या हंगामातील ७ सामन्यांनंतर संघाचे नेतृत्त्वपद सोडले आहे. त्यामुळे आता नेतृत्वाची जबाबदारी कोलकाताने विश्वचषक विजेता इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनवर सोपवली आहे. याबद्दल शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) कोलकाता संघाने माहिती दिली आहे. यानंतर सोशल मिडियावर सर्वत्र दिनेशची चर्चा होत आहे. अशात कोलकाताचा माजी कर्णधार गौतम गंभीरला दिनेशने घेतलेला निर्णय अजिबात आवडलेला नाही.

गंभीरने ट्विट करत लिहिले की, “वारसा बनवण्यात वर्षानुवर्षे जातात, परंतु तो नष्ट करण्यासाठी फक्त एक मिनिट पुरेसा असतो.” गंभीरचे हे ट्विट जोरदार व्हायरल होत आहे. पण त्याने नक्की असे का लिहिले आणि याद्वारे त्याने कुणावर निशाणा साधला आहे?, हे स्पष्टपणे सांगता येणार नाही.

दिनेशला आयपीएल २०२०मध्ये फलंदाजीत जास्त विशेष कामगिरी करता आली नाही. आतापर्यंत झालेल्या ७ सामन्यात त्याला केवळ एक अर्धशतक ठोकण्यात यश आले आहे. म्हणून त्याने फलंदाजीवर जास्त लक्ष केद्रिंत करण्यासाठी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

२०१८ पासून दिनेश कोलकाताचा कर्णधार होता. परंतु आपल्या नेतृत्त्वाखाली तो संघाला आयपीएल चषक मिळवून देऊ शकला नाही. आजवर कोलकाता संघ २०१२ आणि २०१४ या २ आयपीएल हंगामात विजेता ठरला आहे. या दोन्ही वेळेला गंभीर कोलकाताचा कर्णधार होता.

महत्त्वाच्या बातम्या-

याला म्हणतात अंदाज! कार्तिकच्या पायउतार होण्याची भविष्यवाणी झाली होती १२ दिवस आधीच

मुंबईप्रमाणेच कोलकाताही होणार आयपीएल विजेते? पाहा आकडेवारी काय सांगते

कोहली- स्मिथच काय घेऊन बसलात? निवृत्त झालेल्या ‘या’ दिग्गजापुढे सगळेच फिके

ट्रेंडिंग लेख-

यंदा दिल्ली कॅपिटल्स का करत आहे जबरदस्त कामगिरी? जाणून घ्या यशाची ३ कारणे

आयपीएलमधील १० विक्रम, ज्यांना मोडणे आहे कठीण

आयपीएल २०२०: कोलकाता संघाच्या ३ कमकुवत बाजू, ज्यावर त्यांनी द्यायला हवे लक्ष

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---