दक्षिण आफ्रिकाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज एबी डिविलियर्स इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामात कमालीची कामगिरी करत आहे. तो विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कणा बनला आहे. त्यामुळे त्याची प्रशंसा होणे साहजिक आहे. नेदरलँडचा माजी कर्णधार पीटर बोरेननेही डिविलियर्सवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर बोरेन यांनी लिहिले की, “स्टिव्ह स्मिथ, विराट कोहली, केन विलियम्सन, जो रुट आणि बाबर आझम यांच्याबद्दल तुम्ही कधीकधी ऐकत असलेल्या ‘बिग फोर’वरील गप्पा मजेशीर आहेत. कारण एबी डिविलियर्स यांच्यापेक्षा चांगला फलंदाज आहे.”
https://twitter.com/dutchiepdb/status/1316300235992444929?s=20
डिविलियर्सच्या आयपीएलमधील आकडेवारीविषयी बोलायंच झालं तर, त्याने आतापर्यंत १६२ सामने खेळले आहेत. त्यात ४०.२२च्या सरासरीने ४६२५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या आयपीएल २०२०मधील १७९.६८च्या स्ट्राईक रेटने केलेल्या २३० धावांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानातील टी२० स्पर्धेत फ़िक्सिंग? काय आहे नक्की प्रकरण
कर्णधारांचा दे धक्का! कार्तिकने सोडली कॅप्टन्सी; तर ‘या’ खेळाडूलाही नको आहे नेतृत्त्व?
मोठी बातमी! दिनेश कार्तिक कर्णधारपदावरुन पायउतार; मॉर्गन कोलकाताचा नवा कर्णधार
ट्रेंडिंग लेख-
यंदा दिल्ली कॅपिटल्स का करत आहे जबरदस्त कामगिरी? जाणून घ्या यशाची ३ कारणे
आयपीएलमधील १० विक्रम, ज्यांना मोडणे आहे कठीण
IPL 2020 : अफाट कौशल्याने परिपूर्ण असलेले ४ खेळाडू, ज्यांना अद्यापही मिळाली नाही खेळण्याची संधी