नवी दिल्ली | एकीकडे युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग सुरू असताना, दुसरीकडे पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय टी20 स्पर्धा आयोजित केली गेली आहे. दरम्यान, अशी बातमी समोर आली आहे की एका पाकिस्तानी खेळाडूला बुकीने संपर्क साधला आहे आणि त्याला स्पॉट फिक्सिंगची ऑफर दिली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) गुरुवारी सांगितले की सुरु असलेल्या देशांतर्गत टी20 स्पर्धेदरम्यान एका संशयित बुकीने एका खेळाडूशी संपर्क साधला आहे. याची पुष्टी करताना पीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की रावळपिंडी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय टी20 चषक स्पर्धेदरम्यान बुकीने संपर्क साधल्याबद्दल एका खेळाडूने तक्रार केली आहे.
पीसीबीने दिली महत्त्वपूर्ण माहिती
पीसीबीने एका निवेदनात म्हटले आहे की, “ही माहिती मिळाल्यानंतर पीसीबीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वत: तपास केला आणि त्यात काही संवेदनशील माहिती प्राप्त झाली आहे. चौकशीचे स्रोत, क्षमता आणि अधिकार असणाऱ्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला (एफआईए) ही माहिती देण्यात आली आहे. बोर्डाचे लाचलुचपत प्रतिबंधक व सुरक्षा संचालक आसिफ महमूद यांना बुकींनी संपर्क साधल्याची माहिती खेळाडूंनी दिली आहे.”
आयसीसीला दिली जाईल माहिती
असिफ महमूद म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी सुरु असल्यामुळे आम्ही याबद्दल अधिक माहिती देऊ शकत नाही पीसीबी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौंसिलला (आयसीसी) चौकशीच्या प्रगतीविषयी माहिती देत राहील. आम्हाला माहित आहे की काही भ्रष्ट लोकांमुळे या खेळाला धोका निर्माण झाला आहे. काही लोक वैयक्तिक फायद्यासाठी क्रिकेटपटूंची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात.”
राष्ट्रीय संघातील खेळाडूही आहेत स्पर्धेचा भाग
या स्पर्धेत पाकिस्तानचा राष्ट्रीय क्रिकेट संघाचा फलंदाज बाबर आजम, अष्टपैलू इमाद वसीम आणि अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफिजसारखे अव्वल दर्जाचे क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत.
आयपीएलमध्येही बुकीने साधला होता संपर्क
याआधी आयपीएलच्या 13 व्या हंगामात एका खेळाडूशी बुकीने संपर्क साधला होता. या खेळाडूने बीसीसीआयच्या अँटी करप्शन विभागाला माहिती दिली होती. सुरक्षेच्या कारणावरून या खेळाडूचे नाव जहीर करण्यात आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
-आयपीएलमधील सट्टेबाजी रोखण्यात पोलिसांना यश, एका आंतरराष्ट्रीय सट्टेबाजालाही केली अटक
-आयपीएलचे आयोजन यूएईत ३ ठिकाणी झाल्याने मॅच फिक्सिंगला बसेल आळा, पहा काय आहेत सुविधा
-मोठी बातमी! दिनेश कार्तिक कर्णधारपदावरुन पायउतार; मॉर्गन कोलकाताचा नवा कर्णधार
ट्रेंडिंग लेख –
-मॅच-फिक्सिंगच्या आरोपामुळे बंदी घालण्यात आलेले ५ दिग्गज भारतीय क्रिकेटपटू
आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकणारा एन्रीच नॉर्किए आहे तरी कोण?
आयपीएल २०२०: सर्वांच्याच नजरेत भरेल अशी कामगिरी करणारे ५ युवा क्रिकेटर