भारतीय संघाचा माजी दिग्गज गौतम गंभीर आपल्या परखड मतांमुळे नेहमीच चर्चेत असतो. गंभीर आणि एमएस धोनी यांच्यात बाद असल्याच्या चर्चा देखील अशाच मतांमुळे अनेकदा समोर आल्या. अशातच गंभीरने पुन्हा एकदा 2011 विश्वचषकाचा उल्लेख करत एकाच खेळाडूला सर्व महत्व मिळते, असे म्हटले आहे. यावेळी गंभीरने सचिन तेंडुलकर आणि झहीर खान यांचाही उल्लेख केला.
भारताने एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वात 2007 टी-20 विश्वचषक आणि 2011 वनडे विश्वचषक जिंकली. या दोन्ही विश्वचषकांमध्ये एमएस धोनी याचे योगदान महत्वपूर्ण राहिले. मात्र, गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या मते संघातील इतर खेळाडूंची भूमिका देखील महत्वाची होती. धोनीच्या तुलनेत इतर खेळाडूंना माध्यमांमध्ये महत्व मिळत नाही, असेही गंभीर म्हणाला. विश्वचषक 2011च्या अंतिम सामन्यात धोनीने षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला होता. मात्र, त्याच विश्वचषकात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. तर झहीर खान (Zaheer Khan) याने अंतिम सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली होती, ज्याची आठवण गंभीरने पुन्हा एखदा काढली.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गौतम गंभीर म्हणाला, “खेळाडूंना महत्व न मिळण्याबाबत मी जेव्हा बोलतो, तेव्हा माझ्याबद्धल विचार करू नका. पण युवराज सिंगला महत्वा मिळाले नाही, जे मिळाले पाहिजे होते. मला सांगा किती लोक झहीर खान याच्या स्पेलची चर्चा करता, जो अंतिम सामन्यात त्याने टाकला होता. भारताला विजयात महत्वाची भूमिका त्याची राहिली होती. मी खेळाडूंना दोश देत नाहीये, हे मीडिया आणि सोशल मीडियाबाबत आहे. याठिकाणी एखाच खेळाडूला देवाचा दर्जा दिला जातो आणि सर्व खेळाडूंनी मिळून संघासाठी काय केले, याचा विसर पाडला जातो. जर एक खेळाडू विश्वचषक जिंकू शकत होता, तर भारताने आतापर्यंत सर्व विश्वचषक जिंकले असते.”
गंभीर या मुलाखतीत पुढे म्हणाला की, “मी केलेल्या 97 धावांची (अंतिम सामन्यात) चर्चा करूच नका, त्यापेक्षा मोठी कामगिरी इतरांनी केली आहे. 2007 विश्वचषकात युवराजविषयी बोला. 2011 विश्वचषकातही तो महत्वाचा खेळाडू राहिली होता. झहीर खान, मुनाफ पटेल, सुरेश रैना आणि सचिन तेंडुलकर, ज्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या आणि तीन-चार शतके केली होती. आपण फक्त एका षटकाराविषयी बोलत राहतो. मीडियामध्ये नेहमी याविषयी बोलले जाते. लोक मीडिया आणि सोशल मीडियावर यासाठी पैसे लावतात. मलाही असे करता आले असते. पण माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे की, मी देशासाठी काहीतरी केले पाहिजे.”
दरम्यान, ही पहिली वेळ नाहीये की, गंभीरने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वीही अनेकदा त्याने धोनीला एकट्याला अधिक महत्व मिळाल्याचे बोलून दाखवले आहे. गंभीरव्यतिरिक्त भारतीय संघातील इतर काही माजी खेळाडूही याबाबत बोलले आहेत. (Gautam Gambhir again expressed his displeasure regarding the 2011 ODI final)
महत्वाच्या बातम्या –
FIDE Chess World Cup । भारताच्या युवा बुद्धिबळपटूचे स्वप्न तुटले, मॅग्नस कार्लसनकडून पराभव
भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन! जागतिक कुस्ती महासंघाची मोठी कारवाई, कुस्तीपटूंसाठी चिंतेची बाब