---Advertisement---

गौतम गंभीर म्हणतोय;…तर मला हव्या तेवढ्या शिव्या द्या!

---Advertisement---

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) सध्या सतत चर्चेत असतो. असाच तो चर्चेत आला आहे. त्याला दिल्लीत वाढलेल्या प्रदुषणासंबंधीच्या बैठकिस उपस्थित न राहिल्याने ट्रोल करण्यात आले आहे.

गंभीर सध्या इंदोरमध्ये भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील पहिल्या कसोटी (First Test Match) सामन्यात समालोचन करत होता. या दरम्यान त्याचे व्हीव्हीएस लक्ष्मण आणि जतीन सप्रू यांच्याबरोबर इंदोरमध्ये जिलेबी खातानाचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियातून अनेकांनी टीका केली होती.

दिवाळीपासून दिल्लीत बरेच प्रदूषण (Delhi Pollution) होते. ज्यामुळे तेथील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दिल्लीतील प्रदूषणाबाबत शुक्रवारी नगरविकास मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीची बैठक होती. मात्र भाजप खासदार गौतम गंभीर यासाठी अनुपस्थित होता.

त्यामुळे आम आदमी पक्षाने त्याच्यावर निशाणा साधला आणि त्याच्याविरुद्ध एक ट्विट केले होते.

पण आता स्वत: गौतम गंभीरने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

त्याने ट्विट केले आहे. “माझे काम बोलते. जर मला शिव्या दिल्याने दिल्लीतील प्रदूषण कमी होत असेल. तर, कृपया मनापासून मला शिव्या द्या,” असे गंभीर ट्विटमध्ये म्हणाला.

https://twitter.com/GautamGambhir/status/1195304041330270211

‘माझ्या मतदारसंघाशी आणि माझ्या शहराशी असलेली माझी बांधिलकी आहे. गाझीपूर लँडफिलमध्ये हाय-टेक कंपोस्ट मशीन बसविली,’ असेही गंभीर म्हणाला.

‘त्यांच्या भागातील ईडीएमसी शाळांनी महिलांसाठी डिजिटल क्लास, सॅनिटरी पॅड मशीन आणि गरीब लोकांना मोफत जेवण दिले आहे. सकाळी ११ वाजल्यापासून मी आपल्या मतदारसंघ (Constituency) पूर्व दिल्लीसाठी माझ्या कार्यालयात बसतो आणि तेथील सर्व लोकांच्या तक्रारी ऐकल्याशिवाय कार्यालयातून बाहेर जात नाही,’ असे गंभीर म्हणाला.

‘प्रदूषणाची पातळी हळूहळू कमी करता यावी यासाठी आम्ही आमच्या मतदारसंघात मोठी एअर प्युरीफायर मशीन्स बसविण्याविषयीही चर्चा करीत आहोत,’ असेही गंभीर यावेळी म्हणाला आहे.

https://twitter.com/Maha_Sports/status/1195631144286294017

https://twitter.com/Maha_Sports/status/1195615056395816962

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---