भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानं बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यानं अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली. मात्र गंभीर येथेच थांबला नाही. त्यानं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगवरही खरपूस टीका केली. विराट कोहलीच्या फॉर्मवरून गंभीरनं पाँटिंगला फटकारलं.
प्रकरण असं आहे की, अलीकडेच रिकी पॉन्टिंगनं विराटच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले होते. आयसीसीच्या रिव्ह्यूवर बोलताना पॉन्टिंग म्हणाला होता, “मी नुकतीच विराट कोहलीची एक आकडेवारी पाहिली. त्यानं गेल्या पाच वर्षांत फक्त दोन कसोटी शतकं झळकावली आहेत. हे मला योग्य वाटलं नाही. पण हे खरं असेल तर, ही चिंतेची बाब आहे.”
पत्रकार परिषदेत गंभीरला पाँटिंगच्या या कमेंटबद्दल विचारण्यात आलं, ज्यावर त्यानं अतिशय सडेतोड उत्तर दिलं. गंभीर म्हणाला, “पॉन्टिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? मला वाटतं की त्यानं ऑस्ट्रेलियन क्रिकेटबद्दल विचार करायला हवा. मला विराट कोहली आणि रोहित शर्माची चिंता वाटत नाही.”
या पत्रकार परिषदेत गंभीर विराट कोहली आणि रोहित शर्माबद्दल म्हणाला, “सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा अजूनही कठोर परिश्रम करतात. त्यांना अजूनही खूप काही साध्य करायचं आहे, जे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.”
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे वेळापत्रक
पहिली कसोटी – 22 ते 26 नोव्हेंबर, पर्थ (सकाळी 7:50)
दुसरी कसोटी – 6 ते 10 डिसेंबर, ॲडलेड (सकाळी 9:30)
तिसरी कसोटी – 14 ते 18 डिसेंबर, ब्रिस्बेन (सकाळी 5:30)
चौथी कसोटी – 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न (सकाळी 5:00)
पाचवी कसोटी – 3 ते 7 जानेवारी, सिडनी (सकाळी 5:00)
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, सरफराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर
राखीव खेळाडू – मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद
हेही वाचा –
बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी गौतम गंभीरची पत्रकार परिषद, रोहित-विराटबाबत केलं मोठं वक्तव्य!
भारताचे सहज जिंकला असता सामना, सूर्यकुमार यादवच्या या चुकीमुळे पराभव झाला!
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑडिशन देतोय? टी20 मध्ये कसोटीप्रमाणे खेळला हार्दिक पांड्या