बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. टीम इंडियाचे अनेक खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं पत्रकार परिषद घेतली. या मालिकेपूर्वी चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न होते, ज्याचे उत्तर गंभीरनं दिले. रोहित शर्मा मालिकेच्या पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध असेल की नाही? हेही गंभीरनं सांगितलं.
रोहित शर्माची उपलब्धता – या मालिकेपूर्वीच कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीसाठी उपस्थित राहणार नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. रोहित शर्माच्या उपलब्धतेबाबत बोलताना गंभीर म्हणाला, “सध्या रोहित शर्माबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही. आशा आहे की तो उपस्थित असेल. मालिका सुरू होण्यापूर्वी तुम्हाला सर्व गोष्टी कळतील.”
केएल राहुलला पाठिंबा दिला – केएल राहुलबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर गंभीर म्हणाला, “केएल राहुल टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करू शकतो, तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, तो सहाव्या क्रमांकावर खेळू शकतो. तो एकदिवसीय सामन्यांमध्ये विकेटकीपिंग करतो. त्याच्याकडे अनेक गोष्टी करण्याची क्षमता आहे. विचार करा की केएल राहुलसारखे खेळाडू किती देशांकडे आहेत. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत तो एक पर्याय आहे.”
रोहितच्या अनुपस्थितीत बुमराह कर्णधार – नियमित कर्णधार रोहित शर्मा उपलब्ध नसल्यास जसप्रीत बुमराह टीम इंडियाचं नेतृत्व करेल, असंही गंभीरने स्पष्ट केलं. या मालिकेत बुमराह टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून खेळणार आहे.
रोहित-विराटला साथ – रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या खराब फॉर्मबद्दल गंभीर म्हणाला, “सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा अजूनही खूप मेहनत करतात. त्यांना अजूनही खूप काही मिळवायचे आहे. त्यांना धावांची भूक आहे. माझ्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.”
टीकेला प्रत्युत्तर – मुख्य प्रशिक्षक या नात्याने झालेल्या टीकेवर गंभीर म्हणाला, “जेव्हा मी ही नोकरी स्वीकारली, तेव्हा मला माहित होतं की हे एक प्रतिष्ठित काम आहे पण हे काम कठीणही असेल. आतापर्यंत मला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागलेला नाही. आम्ही तिन्ही विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली नाही ही टीका मी मान्य करतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पहिल्या कसोटीसाठी हे दहा दिवस महत्त्वाचे असतील.”
हेही वाचा –
भारताचे सहज जिंकला असता सामना, सूर्यकुमार यादवच्या या चुकीमुळे पराभव झाला!
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑडिशन देतोय? टी20 मध्ये कसोटीप्रमाणे खेळला हार्दिक पांड्या
वरुण चक्रवर्तीची शानदार कामगिरी वाया, रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय