नवीन वर्षात भारतीय क्रिकेटमध्ये अनेक नवीन योजना आणल्या जात आहेत. भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने (बीसीसीआय) पहिल्याच दिवशी एक बैठक आयोजित करत, पुढील वर्षभरातील योजनांबाबत चर्चा केली. यामध्ये खेळाडूंची विश्रांती व आयपीएल यांना विशेष स्थान होते. त्याच मुद्द्यावर आता भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने एक महत्त्वाचे विधान केले आहे.
बीसीसीआयने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा, कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी एक बैठक घेतली. यामध्ये आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंवरील वर्क लोड कमी करण्यासाठी आयपीएल फ्रॅंचाईजी व बीसीसीआय संयुक्त कार्यक्रम राबवणार असा पर्याय सुचवला गेला. त्यानंतर काही आयपीएल फ्रॅंचाईजींनी याबाबत आक्षेपही नोंदवला. आता याच मुद्द्यावर बोलताना गौतम गंभीर याने आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला,
“खेळाडूंना आयपीएलमधून ब्रेक हवा असेल तर काय त्यांनी तो निश्चित घ्यावा. कारण आयपीएलपेक्षा विश्वचषक नक्कीच मोठी स्पर्धा आहे. खेळाडूंना विश्रांतीची गरज असल्यास ती केवळ टी20 क्रिकेटमध्ये देण्यात यावी. वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने वनडे मालिकांमध्ये कोणीही विश्रांती घेऊ नये. मागील दोन विश्वचषकात आपण हेच पाहत आलो आहोत. सर्व खेळाडू एकत्रित न खेळल्याने संघाला नुकसान सोसावे लागले. आयपीएल दरवर्षी येत असते विश्वचषक चार वर्षातून एकदाच येतो.”
गंभीरचे हे वक्तव्य नक्कीच विचार करण्यासारखे आहे. कारण, तो स्वतः लखनऊ सुपरजायंट्स संघाचा मेंटर असून, या संघात केएल राहुल व दीपक हुडा हे भारतीय संघातील नियमित सदस्य सामील आहेत.
(Gautam Gambhir Big Statement On IPL And Players Rest)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! तब्बल 4 वर्षांनी केले कमबॅक, पण सामन्यापूर्वीच झाला कोरोना पॉझिटिव्ह; तरीही खेळतोय सामना
रिषभ पंतला झालेली लिगामेंटची दुखापत आहे तरी काय? लक्षणे आणि उपाय एका क्लिकवर घ्या जाणून