भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर हा नेहमीच त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. गंभीर कोणतेही मत मांडताना मागे-पुढे पाहत नाही. तो निर्भीडपणे देशातील असो किंवा क्रिकेटमधील प्रत्येक गोष्टीवर परखड मत मांडतो. यामुळे तो अनेकदा माध्यमांमध्ये आणि चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतो. अशात पुन्हा एकदा त्याने मोठे विधान केले आहे, ज्यामुळे सर्वत्र त्याची चर्चा रंगली आहे.
काय म्हणाला गंभीर?
गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या मते, वनडे क्रिकेट (ODI Cricket) प्रकारात गोलंदाजांपेक्षा जास्त फलंदाजांचा विचार केला जातो. तसेच, गोलंदाजांच्या ऐवजी बॉलिंग मशीन आणू शकतात. गंभीर पुढे असेही म्हणाला की, 50 षटकांच्या क्रिकेटमधील नियम फलंदाजांच्या बाजूने बनवल्याचे दिसते.
नुकत्याच स्पोर्ट्सकीडा या क्रिकेट वेबसाईटशी बोलताना गंभीरने वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजांना प्रभाव पाडण्याची संधी नसल्याबद्दल दु:ख व्यक्त केले.
गंभीर म्हणाला की, “ज्या कोणी दोन नवीन चेंडू आणि वर्तुळाच्या आत 5 क्षेत्ररक्षण ठेवण्याचा निर्णय बनवला, एकतर त्या व्यक्तीने क्रिकेट खेळले नाहीये, किंवा तो गोलंदाजही नव्हता. माझ्यासाठी, वनडे क्रिकेट म्हणजे, गोलंदाज हाच बॉलिंग मशीन आहे. गोलंदाजांऐवजी बॉलिंग मशीन असणे चांगले आहे. तसेच, प्रेक्षकांना चौकार आणि षटकारांचा आनंद घेऊ द्या.”
यावेळी गंभीरने असेही म्हटले की, गेल्या काही वर्षांमध्ये बोटांच्या फिरकी गोलंदाजांची कार्यक्षमता वनडे सामन्यांमध्ये कमी झाली आहे. तसेच, अर्धवेळ गोलंदाजदेखील फॅशनच्या बाहेर गेले आहेत.
तो म्हणाला, “हल्ली संघ बोटाने फिरकी गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंची निवड कमीच करतात. तसेच, रिव्हर्स स्विंगही करत नाहीत. पुढे पाच वर्तुळात 5 क्षेत्ररक्षक असणे आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही अर्धवेळ गोलंदाजांना पाहणार नाहीत. कोणत्याही फलंदाजाला नेटमध्ये गोलंदाजी करायची नाहीये. कारण, त्यांना माहितीये की, त्यांना सामन्यात गोलंदाजी करायला मिळणार नाही. आता तर बाऊंड्रीही लहान झाली आहे.”
नुकत्याच भारतात पार पडलेल्या वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेत पाहायला मिळाले की, 40 शतकांचा पाऊस पडला. तसेच, तब्बल 600 पेक्षा जास्त षटकारही मारण्यात आले. अशात गंभीरने केलेले विधान सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Gautam Gambhir biggest statement on bowlers said this read here)
हेही वाचा-
‘या’ तारखेला सुरू होणार आयपीएल 2024 हंगाम! फायनलनंतर 10 दिवसांमध्येच खेळायचाय विश्वचषक
धोनीचे जबरा फॅन आहेत WWE सुपरस्टार! पाहा काय म्हणाले झियान आणि केओ