आयपीएल २०२०च्या हंगामात शुक्रवारी (६ नोव्हेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला एलिमिनेटरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ६ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले. विशेष म्हणजे, गेले १३ वर्षे बेंगलोर आयपीएल खेळत असून एकदाही त्यांना आयपीएलचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे गेले ८ वर्षे या संघाच्या नेतृत्वाची धूरा वाहणाऱ्या विराट कोहलीवर माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीरने टीका केली होती. परंतु या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळताना दिसत आहे.
विराटची आरसीबीच्या कर्णधारपदावरुन हाकालपट्टी करा- गंभीर
गंभीर ईएसपीएन क्रिकइन्फो या क्रीडा वेबसाईटशी बोलताना म्हणाला होता की, “वास्तविक समस्या ही जबाबदारीची आहे. गेल्या ८ वर्षांपासून आरसीबीचा कर्णधार असलेल्या विराटने संघाला एकदाही चषक जिंकवून दिला नाही. हा दीर्घ कालावधी आहे. संघाला चषक न मिळवून देताही कोणता कर्णधार अथवा खेळाडू ८ वर्षे त्याच संघाकडून खेळलेला तुम्ही पाहिलाय का?. विराटने संघाच्या पराभवाची जबाबदारी स्विकारली हवी.”
सात वर्षांपुर्वीच्या वादाची खुन्नस कायम!
आरसीबी संघाला विजेता बनवण्याचा अपवाद वगळता विराटच्या नेतृत्त्वाखाली संघाचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. तसेच विराटच्या आकडेवारीवरुन त्याची प्रतिभाही दिसून येते. तरी गंभीरने विराटवर खोचक टीका करण्यामागचे कारण नक्की काय असावे? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला. यावरुन, गंभीरच्या मनात अजूनही २०१३ सालच्या वादाची खुन्नस तरी नाही ना? अशी चर्चा रंगली आहे.
आयपीएल २०१३मध्ये गंभीर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार होता. त्यावेळी आरसीबी आणि केकेआर संघांमध्ये एक सामना झाला होता. त्या सामन्यात विराट बाद झाल्यानंतर पव्हेलियनच्या दिशेने निघाला होता. जाता-जाता विराट आणि गंभीरमध्ये बाचाबाची झाली होती. पुढे हे प्रकरण वाढत गेले आणि दोघांमध्ये मोठा वाद पेटला. शेवटी पंचांना मध्यस्थी करुन हे प्रकरण शांत करावे लागले. त्यानंतर या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या गैरवर्तनाची शिक्षा भोगावी लागली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटला RCB च्या कर्णधारपदावरुन काढून टाकावे, गौतम गंभीरचे रोखठोक मत
विराट कोहली आरसीबीचा कर्णधार आहे, हे तर आमचे भाग्यच, पाहा कोण म्हणतंय
दिग्गजाने निवडला सर्वोत्कृष्ट आयपीएल संघ; विराटला डच्चू तर सूर्यकुमार यादवला दिले ‘हे’ स्थान
ट्रेंडिंग लेख-
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा