भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत पहिल्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला होता, मात्र भारताने पुनरागमन करत दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला मात दिली होती. तीच लय भारतीय संघ कायम ठेवेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र भारताने तिसऱ्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केली.
भारताने या सामन्यात अंतिम अकराच्या संघात एक बदल केला होता. दुसऱ्या सामन्यात पदार्पण केलेल्या सूर्यकुमार यादवला वगळून नियमित सलामीवीर रोहित शर्माला संघात स्थान मिळाले होते. मात्र या निर्णयावर आता भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने टीका केली आहे.
“कमीत कमी ४ सामन्यात तरी संधी द्या”
सूर्यकुमार यादवने भारताकडून दुसऱ्या टी२० सामन्यात पदार्पण केले होते. मात्र या सामन्यात वरच्या फळीतील फलंदाजांनीच सामना संपवल्याने त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. भारताने पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्माला विश्रांती दिली होती. मात्र तिसऱ्या सामन्यात त्याला संघात पुनरागमन करायचे असल्याने सूर्यकुमार यादवला वगळण्यात आले. याच गोष्टीवर गंभीरने नाराजी व्यक्त केली.
गंभीर म्हणाला, “तुम्ही जर एखाद्या खेळाडूला संघात संधी देत असाल तर त्याला किमान ३-४ सामने तरी संधी द्या. त्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळायला हवी. जर त्याने चांगले प्रदर्शन केले तर तुम्हाला एक उत्तम पर्याय मिळू शकतो. आणि हे केवळ विश्वचषकाच्या दृष्टीतूनच नव्हे तर संघबांधणीच्या दृष्टीतून देखील महत्वाचे आहे.’
“दुखापत झाल्यास पर्याय काय?”
सूर्यकुमारला पुरेशी संधीच न दिल्याने आता तो पर्याय म्हणून योग्य आहे की नाही, हे देखील तपासले गेले नाही, असे गंभीर यावेळी म्हणाला. “तुम्ही विश्वचषकासाठी सात महिने आधी तयारी सुरु केली होती. आता जर विश्वचषका दरम्यान जर मधल्या फळीतील कोणाला दुखापत झाली तर तुम्ही कोणाला संधी देणार आहात? कारण तुम्ही सूर्यकुमारला पुरेशी संधी न दिल्याने तो पर्याय म्हणून सक्षम आहे की नाही याबाबत तुम्हाला कसलीच खात्री नाहिये”, अशा शब्दात गंभीरने आपली नाराजी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या:
या ५ भारतीय खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाने गमावला तिसरा टी२० सामना
बीसीसीआयचा मोठा निर्णय, ही देशांतर्गत स्पर्धा पुन्हा एकदा करण्यात आली स्थगित
तिसऱ्या टी२० सामन्यातील पराभवानंतर कोहली निराश होत म्हणाला, माझ्या खेळीचा काय उपयोग, जर






