गौतम गंभीर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून, त्यांने त्याच्या अनेक निर्णयांनी जागतिक क्रिकेटला आश्चर्यचकित केले आहे. भारतीय क्रिकेटमध्ये गौतम गंभीरचा हाच परिणाम आहे की आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे सुपरस्टार रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहेत.
गाैतम गंभीरने अनेक वेळा टीम इंडियामधून सुपरस्टार संस्कृती संपवण्याबद्दल बोलला आहे. गौतम गंभीरवर न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच मैदानावर कसोटी मालिका गमावल्याबद्दल खूप टीका झाली आहे. परंतु त्याने आपल्या कार्यकाळात संघाच्या वातावरणात अनेक बदल केले आहेत. गंभीरच्या प्रभावामुळेच 23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजीच्या पुढील फेरीत टीम इंडियाचे सात ते आठ खेळाडू खेळताना दिसतील.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली 2012 नंतर रणजी ट्रॉफीमध्ये पहिला सामना खेळण्यास सज्ज आहे. त्याने दिल्ली विरुद्ध रेल्वेच्या सामन्यासाठी स्वतःला उपलब्ध करून दिले आहे. मानेच्या दुखापतीमुळे कोहली 23 जानेवारीपासून सौराष्ट्र विरुद्ध दिल्लीच्या आगामी सामन्यात खेळू शकणार नाही. परंतु त्याने दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) ला कळवले आहे की तो रणजी ट्रॉफीमधील संघाच्या शेवटच्या लीग सामन्यात खेळण्यासाठी उपलब्ध असेल.
रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी संघाची घोषणा करताना स्पष्ट केले होते की तो 23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीत खेळेल. काल सोमवारी जेव्हा मुंबईचा संघ जाहीर झाला तेव्हा रोहितचे नाव त्यात होते. तो जम्मू आणि काश्मीरविरुद्ध डावाची सुरुवात करेल.
रोहित विराट व्यतीरिक्त टीम इंडियाचे अनेक खेळाडू रणजी सामने खेळताना दिसतील. रोहित आणि विराट व्यतिरिक्त, त्यात रिषभ पंत, यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, शिवम दुबे आणि शुबमन गिल यांचा समावेश आहे.
हेही वाचा-
IND VS ENG; मालिकेपूर्वी मोठी घोषणा, दिल्लीच्या या खेळाडूची उपकर्णधारपदी निवड
IND VS ENG: टी20 क्रिकेटमध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड
‘हा जगाने पाहिलेला सर्वात महान व्हाईट बॉल क्रिकेटपटू …’, माजी कर्णधाराकडून विराटची पाठराखण?