भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने काही वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. तो सध्या समालोचकाची भूमिका पार पाडत आहे. क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी देखील तो वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकताच पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात त्याने वादग्रस्त वक्तव्य केले होते. ज्यामुळे चाहत्यांनी त्याला धारेवर धरले आहे.
हा प्रकार पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान घडला. गौतम गंभीर या सामन्यात समालोचाकाची भूमिका पार पाडत होता. त्यावेळी त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की, वर्तमान क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट फिनिशर कोण आहे? याचे उत्तर देताना गंभीरने म्हटले की, “आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीची आकडेवारी ‘तथाकथित फिनिशर’ पेक्षा चांगली आहे.”
त्याने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हटले की, “आंद्रे रसलला फिनिशर म्हटले जाते. परंतु माझ्या मते, गेल्या काही वर्षांपासून विराट कोहली सर्वोत्कृष्ट फिनिशर आहे तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्यामुळे स्वतःला फिनिशर म्हटल्यावर कोणी फिनिशर होत नाही. तथाकथित फिनिशरच्या तुलनेत विराट कोहली सर्वोत्कृष्ट आहे.”
हे भाष्य करताना त्याने कुठेही धोनीचा उल्लेख केला नाही. परंतु धोनीच्या चाहत्यांना ही गोष्ट खूप खटकली आहे. ट्विटरवर अनेकांनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. अनेकांनी कयास लावला की गंभीरने धोनीलाच तथाकथित फिनिशन म्हटले आहे.
Just wondering, who is the 'so called finisher' he is referring to? 🤔🤔#IPL2021 #KKRvPBKS #PBKSvsKKR pic.twitter.com/50l7U9VxcB
— Roopesh (@roopeshtiwari7) October 1, 2021
एका युजरने ट्विट करत म्हटले की, “जेव्हा गंभीरला धोनी वर टीका करायची असते त्यावेळी तो कोहलीचे कौतुक करतो. जेव्हा कोहली वर टीका करायची असते तेव्हा तो रोहितचे कौतुक करतो. माझे असे म्हणणे आहे की, गंभीरने हे घाणेरडे राजकारण सभ्य लोकांच्या खेळात आणू नये.”
तर दुसऱ्या एका युजरने धोनीचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यावेळी धोनीने २०११ विश्वचषक स्पर्धेत षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. हा फोटो शेअर करत म्हटले की, “तथाकथित फिनिशर? गंभीरने जे कार्य अर्ध्यात सोडलं होतं ते धोनीने पूर्ण केलं होतं.”
https://twitter.com/ashutosspeaks/status/1444009034965676033
Jab Gambhir ko Dhoni ki burai karni ho toh Kohli ki tarif karega, jab Kohli ki burai karni ho toh Dhoni ki tarif. 😭
— Silly Point (@FarziCricketer) October 2, 2021
धोनीने नुकतेच सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना शेवटच्या ३ चेंडूत २ धावांची गरज असताना षटकार मारला होता आणि त्याच्या संघाच्या पदरात विजय पाडला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
खेळ मजामस्तीचा! नाणेफेकीवेळी रिषभ-रोहितने एकमेकांची उडवली खिल्ली ; मजेशीर क्षण कॅमेऱ्यात कैद
आयपीएलचा ‘थलैवा’! कधीही न मोडणारा विक्रम धोनीने केला आपल्या नावे