जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अनेक सेलिब्रेटींनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच आता भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनेही कोविड टेस्ट केल्यानंतर स्वत:ला एकांतवासात ठेवले आहे. याबद्दल त्यानेच ट्विट करत माहिती दिली आहे.
त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे की “घरातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने मी देखील कोविड टेस्ट केली आहे. टेस्टच्या अहवालाची अजून प्रतिक्षा आहे. मी स्वत:ला एकांतवासात ठेवले आहे. मी सर्वांना विनंती करतो की सर्व नियम पाळा. कृपया हलक्यात सर्व घेऊ नका. सुरक्षित राहा.”
https://twitter.com/GautamGambhir/status/1324573094279847937
भारताला 2007 चा टी20 विश्वचषक आणि 2011 चा वनडे विश्वचषक मिळवून देण्यात गंभीरचा महत्त्वाचा वाटा आहे. या दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात त्याने केलेली अर्धशतकी खेळी महत्त्वाची ठरली होती.
गंभीरने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 58 कसोटी सामन्यात 41.95 च्या सरासरीने 4154 धावा केल्या आहेत. तसेच 147 वनडे सामन्यात 5238 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गंभीरने 37 टी 20 सामने भारताकडून खेळताना 27.41 च्या सरासरीने 932 धावा केल्या आहेत.
वाचा –
गौतम गंभीर का ठरला टीम इंडियासाठी संकटमोचक, हे दाखवून देणाऱ्या ३ खेळी
-‘गौतम गंभीरला अधिक सामन्यांत नेतृत्व करण्याची संधी मिळाली असती, तर तो सर्वोत्तम कर्णधार बनला असता’
-कपिल देव, सुनिल गावसकरपासून ते गौतम गंभीरपर्यंत, जाणून घ्या कशी घेतली या भारतीय खेळाडूंनी निवृत्ती