बीसीसीआयने टी20 विश्वचषक 2024 च्या विजयानंतर जवळपास एका आठवड्यात मुख्य प्रशिक्षक पद भरले आहे. राहुल द्रविडच्या जागी अधिकृतपणे गौतम गंभीरकडे जबाबदारी आली. श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीर आपल्या पदाची धुरा सांभाळणार आहे. जुलैच्या शेवटी टीम इंडिया श्रीलंकेला जाणार आहे, जिथे भारतीय संघाला 3 टी20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यात 27 जुलैपासून टी20 मालिका खेळवली जाणार आहे. गंभीरच्या पहिल्याच दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह काही वरिष्ठ खेळाडू दिसणार नसल्याचे वृत्त आहे.
टी-20 विश्वचषकात टीम इंडियाने विजेतेपद पटकावले. यासह रोहित-कोहली आणि जडेजा या तिघांनी टी20 फॉरमॅटमधील पर्व संपवले. पण चाहत्यांना एकदिवसीय आणि कसोटीत महान खेळाडू पाहायला मिळणार आहेत. मात्र यासाठी आता बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआय श्रीलंका दौऱ्यातून रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देणार आहे. बांगलादेशचा संघ भारतात येईपर्यंत तिन्ही दिग्गज खेळाडू विश्रांतीवर राहतील. सप्टेंबरच्या अखेरीस भारत आणि बांगलादेश यांच्यात टी-20 आणि कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.
मंगळवारी (9 जुलै) संध्याकाळी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी गंभीरचे बीसीसीआयमध्ये स्वागत केले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट केले आणि लिहिले, ‘मला खूप आनंद होत आहे की मी गौतम गंभीरचे भारतीय क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून स्वागत करत आहे. आधुनिक काळात क्रिकेट झपाट्याने विकसित झाले आहे आणि गौतमने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत विविध भूमिकांमध्ये चमकदार कामगिरी करून त्यात बदल जवळून पाहिले आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी गौतम हा आदर्श व्यक्ती आहे. टीम इंडियाबद्दलची त्याची स्पष्ट दृष्टी आणि त्याचा अफाट अनुभव त्याला ही रोमांचक आणि सर्वात मागणी असलेली कोचिंग भूमिका हाताळण्यासाठी पूर्णपणे तयार करतो. या नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी बीसीसीआयने त्याला पाठिंबा दिला आहे.
प्रशिक्षक झाल्यानंतर गौतम गंभीरने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे आपले उद्दिष्ट स्पष्ट केले. त्यांनी लिहिले, ‘भारत ही माझी ओळख आहे आणि देशाची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा विशेषाधिकार आहे. वेगळ्या फॉर्ममध्ये असूनही, मला परत आल्याचा अभिमान आहे. पण प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, हे माझे ध्येय नेहमीप्रमाणेच आहे. भारतीय खेळाडू 1.4 अब्ज भारतीयांची स्वप्ने त्यांच्या खांद्यावर घेऊन जातात आणि ही स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन!’
महत्तवाच्या बातम्या-
भारतीय संघाला मिळणार नवे बँटींग बाॅलिंग कोच, दोघांनी गाजवले आहेत मैदान
‘आयपीएलमधून होते 25 कोटी रुपयांची कमाई, तर …’ जाणून घ्या नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची एकूण संपत्ती
काय सांगता, विराट कोहलीच्या तिसऱ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाडची नजर? स्वत:हून म्हणाला…