चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (सीएसके वि. केकेआर) यांच्यात दुबई येथे झालेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या अंतिम सामन्यात सीएसकेने केकेआरचा २७ धावांनी पराभव करत आयपीएलचे जेतेपद पटकावले. एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचे हे चौथे आयपीएल जेतेपद आहे. आयपीएलचा यंदाचा हंगाम संपत नाही तोच पुढील हंगामाचे वेध क्रिकेटप्रेमींना लागले आहेत. मेगा लिलावापूर्वी संघात कोणत्या खेळाडूस रिटेन करावे याची चर्चा आता सुरू झाली आहे. याबाबत भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने एक खळबळजनक विधान केले आहे.
सीएसकेने कर्णधार एमएस धोनी, रवींद्र जडेजा आणि फाफ डु प्लेसिस यांचा मेगा लिलावापूर्वी आयपीएल २०२२ मधील आपल्या संघात यांना रिटेन करावे का? असा प्रश्न गंभीरला विचारण्यात आला होता. त्याला गंभीरने उत्तर दिले की, सध्या किती खेळाडूंना रिटेन करता येईल हे ठरलेले नाही. तसेच धोनी पुढील वर्षी सीएसके संघात कोणत्या भूमिकेत दिसेल? यावर त्याला रिटेन करणे न करणे अवलंबून असेल.
गंभीर म्हणाला, ‘पुढील वर्षी सीएसकेसाठी धोनी कोणत्या भूमिकेत दिसणार आहे यावर त्याला रिटेन करण्याचा निर्णय अवलंबून असेल. पण जर मला सीएसकेकडून खेळाडूंना रिटेन करण्यास सांगितले गेले तर मी ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा आणि फाफ डु प्लेसिसची यांची नावे पुढे करेल.’
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक जेतेपद पटकावणाऱ्या कर्णधारांच्या यादीत सीएसकेचा कर्णधार धोनी चार जेतेपदे जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे. आयपीएलच्या इतिहासात फक्त रोहित शर्माकडे त्याच्यापेक्षा जास्त जेतेपद आहेत. त्याने पाच वेळा मुंबई इंडियन्ससाठी जेतेपद पटकावले आहे. जर आपण धोनीच्या नेतृत्त्व कामगिरीवर नजर टाकली तर त्याने आपल्या संघाला १२ पैकी ११ वेळा प्लेऑफमध्ये नेले आहे. त्यापैकी ९ वेळा त्याच्या संघाने अंतिम सामना खेळला आहे. म्हणून धोनीकडे आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून पाहिले जाते.
आयपीएलच्या इतिहासात धोनी हा पहिला कर्णधार होता, ज्याने सलग दोन हंगामामध्ये (२०१० आणि २०११) जेतेपद पटकावले होते. त्यानंतर दुसऱ्या वेळी रोहित शर्मा (२०१९, २०२०) मुंबई इंडियन्ससाठी सलग दोन वेळा जेतेपद पटकावले होते. सर्वाधिक वेळा टी -२० जेतेपद पटकावणाऱ्या कर्णधाराबद्दल बोलायचे झाले तर धोनीने सहा जेतेपदांसह अव्वलस्थानी आहे. तर रोहित शर्मा पाच जेतेपदांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकासाठी युझवेंद्र चहल ऐवजी राहुल चाहरला का दिली टीम इंडियात संधी? विराटचा खुलासा
टी२० विश्वचषकानंतर शास्त्रींबरोबरच ‘हे’ दिग्गजही सोडू शकतात टीम इंडियाची साथ
‘कोहलीआधी पुजारा बनला चँपियन, कोणत्या जगात राहतोय आपण!’, सीएसकेचा विजय अन् पुजारा होतोय ट्रेंड