आयपीएल 2024 मध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कामगिरी आतापर्यंत फारच खराब राहिली आहे. संघाला 9 सामन्यांमध्ये संघाला केवळ 2 सामने जिंकता आले आहेत. स्टार फलंदाज विराट कोहलीचा फॉर्म उत्कृष्ट असूनही आरसीबीला या हंगामात चांगली कामगिरी करता आलेली नाही.
आरसीबीच्या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या दरम्यान आता टीम इंडियाचा माजी सलामीवीर आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सल्लागार गौतम गंभीर यानं विराट कोहलीला पाठिंबा दिला आहे. विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटबद्दल बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, ‘तुमचा संघ सामना जिंकतो की नाही यावर सर्व काही अवलंबून असतं. जर तुमचा संघ सामना जिंकत असेल तर त्याबद्दल कोणी बोलत नाही. पण जेव्हा तुमचा संघ सामना हरतो तेव्हा तुम्ही त्या सर्व गोष्टी शोधता ज्यामुळे तुमचा संघ सामना हरला.”
गौतम गंभीर पुढे म्हणाला की, “आज प्रत्येक खेळाडूचा खेळ वेगळा आहे. जे ग्लेन मॅक्सवेल करू शकतो, ते विराट कोहली करू शकत नाही आणि जे विराट कोहली करू शकतो, ते ग्लेन मॅक्सवेल करू शकत नाही. जर तुम्ही सलामीपासून आठव्या क्रमांकापर्यंत एकाच प्रकारचे खेळाडू संघात ठेवले तर तुम्ही 300 धावा करू शकता आणि 30 धावांवर बाद देखील होऊ शकता. एक चांगला संघ म्हणजे तुमच्याकडे एक चांगला सेटअप आणि सर्व प्रकारचे खेळाडू असणं होय. शेवटी संघ जिंकणं महत्वाचं आहे.”
गौतम गंभीर पुढे बोलताना म्हणाला की, “जर तुम्ही 100 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि तुमची टीम जिंकली तर सर्वजण तुमचं कौतुक करतील पण जर तुम्ही 180 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आणि तुमची टीम हरली तर प्रत्येकजण तुमच्याबद्दल बोलतील. चांगला स्ट्राइक रेट असणं महत्त्वाचे आहे परंतु ते वेळ आणि तेथील परिस्थितीवर अवलंबून आहे. जर तुमच्या 50 धावांवर 4 विकेट पडल्या तर तुम्ही 170 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजीची अपेक्षा करू शकत नाही.”
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! भारताला विश्वचषक जिंकवून देणारे गॅरी कर्स्टन बनले पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक
“आता 250 धावांचा बचाव करणंही अवघड”, रिषभ पंतनंही केले ‘इम्पॅक्ट खेळाडू’ नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित
आधीच पराभव, त्यात दंडाची कारवाई, मुंबईच्या कोणत्या खेळाडूला बसलाय फटका? वाचा संपूर्ण प्रकरण