भारतीय संघाला २००७ टी-२० विश्वचषक आणि २०११ विश्वचषक स्पर्धा जिंकून देण्यात माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीरने मोलाची भूमिका बजावली होती. अनेक मोठमोठ्या सामन्यात गंभीरने तुफानी खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर तो राजकारणाच्या पिचवर देखील टीचून फलंदाजी करत आहे. नुकतीच त्याने भारताची सर्वकालिन कसोटी प्लेइंग इलेव्हन निवडली आहे, ज्यामध्ये त्याने आपल्यासोबत खेळलेल्या खेळाडूंना अधिक प्राधान्य दिले आहे.
गौतम गंभीरने सलामी फलंदाज म्हणून वीरेंद्र सेहवाग आणि सुनील गावसकर यांना या संघात स्थान दिले आहे. यासह मध्यक्रमात त्याने राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांना जागा दिली आहे. तसेच एकमेव अष्टपैलू म्हणून त्याने दिग्गज भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांना आपल्या संघात स्थान दिले आहे. तर यष्टिरक्षक फलंदाज म्हणून त्याने एमएस धोनीला आपल्या संघात निवडले आहे.(Gautam Gambhir picks all time India test 11)
या कसोटी सर्वकालिन ११ खेळाडूंच्या संघात त्याने ४ गोलंदाजांना स्थान दिले आहे. यामध्ये दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे आणि ऑफ स्पिनर हरभजन सिंगचा समावेश आहे. तसेच गंभीरने अनिल कुंबळे यांना या संघाचे कर्णधारपद दिले आहे. यासह वेगवान गोलंदाज म्हणून त्याने जहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांना या संघात सहभागी केले आहे.
गौतम गंभीरने निवडलेली भारताची सर्वकालिन कसोटी प्लेइंग इलेव्हन
वीरेंद्र सहवाग, सुनील गावस्कर,राहुल द्रविड़, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, कपिल देव, एमएस धोनी (यष्टिरक्षक), अनिल कुंबळे (कर्णधार), हरभजन सिंग, जहीर खान, जवागल श्रीनाथ.
गौतम गंभीरची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी
गौतम गंभीरने भारतीय संघासाठी एकूण ५८ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ४२.० च्या सरासरीने ४१५४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ९ शतक आणि २२ अर्धशतक झळकावले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
इतिहासात, आम्ही आलोय.. भारताचा क्रिकेटजगताला संदेश..
दु:खद बातमी! भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या ‘या’ दिग्गजाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
आजच्या दिवशी ४७ वर्षांपूर्वी भारताने खेळला होता पहिला वनडे, ‘असा’ लागला होता निकाल