भारतीय संघाचे माजी फलंदाज आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने भारतीय खेळाडूंची त्याची आवडती सर्वकालिन इलेव्हन निवडली आहे. गौतम गंभीरने सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि अनिल कुंबळे यांसारख्या अनेक दिग्गज खेळाडूंना आपल्या सर्वकालीन भारत इलेव्हनचा भाग बनवले आहे.
गौतम गंभीरने आपल्या संघात 6 फलंदाज, 2 अष्टपैलू, 2 फिरकीपटू आणि एका वेगवान गोलंदाजाचा समावेश केला आहे. मात्र, गौतम गंभीरने सध्याचा कसोटी आणि वनडे कर्णधार रोहित शर्माचा आपल्या सर्वकालिन इलेव्हनमध्ये समावेश केलेला नाही. अलीकडील टी20 विश्वचषक 2024 विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा गौतम गंभीरच्या सर्वकालीन इंडिया-11 मध्ये समावेश न असणे चाहत्यांसाठी धक्कादायक आहे.
गौतम गंभीरने सलामीवीर म्हणून वीरेंद्र सेहवागसोबतच स्वत:ला सलामीच्या स्थानी ठेवले आहे. या दोन्ही खेळाडूंनी भारतीय संघासाठी अनेकदा सलामीला शानदार भागीदारी केल्या होत्या. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर, गंभीरने माजी भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची निवड केली आहे. त्याचवेळी गौतम गंभीरने विराट कोहलीला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला ठेवले आहे.
याशिवाय गंभीरने त्याच्या सर्वकालीन इंडिया-11 च्या वेगवान गोलंदाजाची जबाबदारी झहीर खान आणि इरफान पठाण यांना दिली आहे. तसेच फिरकीपटू म्हणून रविचंद्रन अश्विन आणि अनिल कुंबळेच्या नावाचाही या संघात समावेश आहे. तसेच त्याने एमएस धोनीला यष्टिरक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
सध्याचे भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्यांच्या सर्वकालीन इंडिया इलेव्हनमध्ये समाविष्ट केलेल्या सर्व खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली आहे. जागतिक क्रिकेटमध्ये विक्रम नोंदवणाऱ्या अनेक खेळाडूंचा या यादीत समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारे सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे अनुक्रमे पहिले आणि दुसरे फलंदाज आहेत. सचिन तेंडुलकरच्या नावावर एकूण 100 आणि विराट कोहलीच्या नावावर एकूण 80 शतके आहेत. याशिवाय अनिल कुंबळे आणि रविचंद्रन अश्विन हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय खेळाडू म्हणून पहिले आणि दुसरे गोलंदाज आहेत. कुंबळेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 956 विकेट्स घेतल्या आहेत, तर अश्विनच्या नावावर 744 आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत.
गौतम गंभीरचा ऑल टाइम इंडिया-11
वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), अनिल कुंबळे, रविचंद्रन अश्विन, इरफान पठाण आणि झहीर खान.
हेही वाचा –
इंग्लंडमध्ये रहाणेचे खणखणीत शतक, बांगलादेश मालिकेपूर्वी ठोठावलं टीम इंडियाचं दार!
दोन वर्षांनंतर कसोटी शतक! बांगलादेशच्या या फलंदाजानं पाकिस्तानला धो-धो धुतलं
‘हिटमॅन’च्या निशाण्यावर वीरेंद्र सेहवागचा जबरदस्त रेकॉर्ड… बांगलादेश मालिकेत रचणार इतिहास!