दिल्ली | आंध्रप्रदेश विरुद्ध दिल्ली रणजी ट्राॅफीतील सामन्यात आज दिल्लीचा माजी कर्णधार गौतम गंभीरने शानदार फलंदाजी करताना नाबाद ९२ धावा केल्या आहेत. आजचा दिवस संपताना तो १५४ चेंडूत ८ चौकारांच्या सहाय्याने ९२ धावांवर नाबाद राहिला.
दुसऱ्या दिवशी या सामन्यात आंध्रप्रदेशचा पहिला डाव ३९० धावा संपुष्टात आल्यावर दिल्लीकडून सलामीला आलेल्या गंभीर आणि हितेन दलाल जोडीने १०८ धावांची जोरदार सलामी दिली. दलाल ५८ धावांवर बाद झाल्यावर गंभीरने कर्णधार ध्रुव शोरेसह त्याने कोणताही पडझड होऊ न देता ८२ धावांची भागीदारी केली.
दुसऱ्या दिवसाखेर दिल्लीच्या १ बाद १९० धावा केल्या आहेत. ते अजूनही २०० धावांनी पिछाडीवर आहे.
१९९९-२००० हंगामात गंभीरने आपले प्रथम श्रेणी पदार्पण केले होते. तो आपला शेवटचा सामना खेळत आहे.
गंभीरने आत्तापर्यंत भारताकडून 58 कसोटी सामने, 147 वनडे सामने आणि 37टी20 सामने खेळले आहेत. त्याने एकूण 242 सामने खेळताना 38. 45 च्या सरासरीने 10324 धावा केल्या आहेत. यात त्याने 20 शतके आणि 63 अर्धशतके केली आहेत.
Gautam Gambhir receives guard of honour from Andhra players! 🙌🏼❤️#RanjiTrophy #ThankYouGambhir pic.twitter.com/C26xGOFFdn
— Team Gautam Gambhir (@gautamgambhir97) December 7, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–आॅस्ट्रेलियाच्या कर्णधाराची विकेट घेत इशांत शर्माने केला मोठा पराक्रम
–अॅडलेड कसोटीत शतकी खेळी केलेल्या चेतेश्वर पुजाराला या कारणासाठी हवे ‘चॉकलेट मिल्कशेक’
–चेतेश्वर पुजाराच्या ‘स्टिव्ह’ या टोपन नावामागचे रहस्य शेन वॉर्नने उलगडले