आयपीएल 2020 च्या हंगामात आपल्या फलंदाजीने व गोलंदाजीने आपल्या खेळाची चमक दाखवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सच्या सॅम करनवर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर प्रभावित झाला आहे. तसेच गंभीरने करनचे कौतुक करताना त्याच्याबाबतीत एक भविष्यवाणीही केली आहे.
चेन्नई सुपर किंग्स संघाकडून यंदा आयपीएलमध्ये खेळताना पहिल्याच सामन्यापासून इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन हा आपली छाप सोडत आहे. काही सामन्यात मधल्या फळीमध्ये तर काही सामन्यात सलामीला येऊन पॉवरप्लेमध्ये धावा करण्याचे काम सॅम करनने या हंगामात केले आहे. फलंदाजी प्रमाणेच सॅम करन गोलंदाजी करतानाही चमकदार कामगिरी केली आहे.
करनने चेन्नईकडून फलंदाजी करताना 13 सामन्यांत 182 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 13 बळी घेऊन चेन्नईसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज देखील तो ठरला आहे.
चेन्नई आणि सॅम करनचे गंभीरने केले कौतुक
सॅम करन सारखा युवा क्रिकेटपटू वाढत्या वयानुसार त्याच्या खेळात उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. भविष्यात तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून नावाजलेला असेल अशी भविष्यवाणी गौतम गंभीरने केली आहे.
चेन्नईच्या संघाचा खेळ या हंगामात अतिशय वाईट होता. सॅम करन हीच त्यांची मोठी सकारात्मक बाजू होती. पुढील हंगामात चेन्नईने बरेच बदल करणे गरजेचे आहे. संघात प्रौढ खेळाडू अधिक असून युवकांना देखील संधी द्यायला हवी, असा सल्ला देखील गौतम गंभीरने चेन्नईला दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
राग भोवला! ख्रिस गेलला ‘त्या’ कृत्यामुळे सुनावण्यात आली शिक्षा
कमाल लाजवाब राहूल! आयपीएलमध्ये अनोखी कामगिरी करत विराट कोहलीच्या विक्रमाची केली बरोबरी
करमणुकीचा बाप! विरूकडून गेलला कौतुकाची थाप; दिली नवी उपाधी
ट्रेंडिंग लेख –
सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार
…आणि १५ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ खेळीने एमएस धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला






