भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज गौतम गंभीर याला एका कार्यक्रमात भारताच्या भावी कर्णधारांची नावे विचारण्यात आले, यावर त्याने सर्वांना आश्चर्यचकित करणारे उत्तर दिले. गंभीरच्या मते पृथ्वी शॉ भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार होऊ शकतो. याबरोबरच तो आक्रमक कर्णधार म्हणून देखील सिद्ध होऊ शकतो. शॉनंतर गंभीरने हार्दिक पांड्या याला कर्णधार म्हणून पसंती दर्शवली. मात्र, गंभीर तिसऱ्या कर्णधाराविषयी उत्तर देऊ शकला नाही.
नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात गौतम गंभीर (Gautam Gambhir) मुख्य अतिथीच्या रुपात उपस्थित होता. कार्यक्रमाच्या निवेदिकेने गंभीरला भारतीय संघाच्या भविष्यातील कर्णधारांची नावे विचारल. तिच्या या प्रश्नाचे उत्तर देताना गंभीर म्हणाला की, “सर्वात पहिले नाव पृथ्वी शॉ (Prithwi Shaw) याचे आहे. लोक त्याच्या मैदानाबाहेरील कृतींकडे जास्त लक्ष देतात. मात्र, प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांचे कामच हे असते की खेळाडूला योग्य मार्ग कसा दाखवला जाईल. यावर निवडकर्त्यांनी लक्ष द्यायला हवे, पृथ्वी शॉ कर्णधार होऊ शकतो कारण त्याच्या खेळात आक्रमकता आहे. भविष्यात तो भारतासाठी आक्रमक आणि यशस्वी कर्णधार होऊ शकतो. ”
आयसीसी विश्वचषक 2011च्या अंतिम सामन्यात 97 धावांची महत्वपूर्ण खेळी करणाऱ्या गौतम गंंभीरने कर्णधारांच्या या यादीत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याचे नाव देखील घेतले. तिसऱ्या खेळाडूचे नाव मात्र तो सांगू शकला नाही. तिसऱ्या खेळाडूचे नाव सांगणे त्याला अवघड वाटत होते. मात्र, पृथ्वी शॉ आणि हार्दिक पांड्या यांना गंभीरने भविष्यातील कर्णधारांच्या यादीत जागा दिली. पृथ्वी शॉ मागील काही वर्षापासून भारतीय संघाबाहेर आहे. देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगले प्रदर्शन करुनही निवडकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
हार्दिक पांड्या भारताचा कर्णधार होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया काही पाकिस्तानी दिग्गजांनी याआधी देखील दिली होती. त्यानंतर टी20 विश्वचषक संपल्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध खेळलेल्या टी20 मालिकेत हार्दिककडे नेतृत्व सोपवण्यात आले होते. ही मालिका भारताने 1-0 अशा फरकाने जिंकला होती. (Gautam Gambhir predicted that Prithwi Shaw or Hardik Pandya can be the next Captain of Indian Team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम, पण अबू धाबीत आलंय रैना नावाचं वादळ, गोलंदाजांना झोडपूनच काढलं
दुसऱ्या वनडेतून ‘या’ दोन खेळाडूंची होऊ शकते हाकालपट्टी, भारताच्या माजी दिग्गजाचे वक्तव्य