न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सलग 3 सामन्यांमध्ये खराब कामगिरी केली आहे. तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी निराशा केली आणि फलंदाजी करताना ते फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करताना दिसले. भारतीय संघाच्या हाराकिरीनंतर कर्णधार रोहितशिवाय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्याही अडचणी वाढल्या आहेत. गंभीर प्रशिक्षक झाल्यापासून संघाची कामगिरी केवळ टी20 फॉरमॅटमध्येच चांगली राहिली आहे. मात्र संघाने वनडे आणि कसोटीत लाजिरवाण्या विक्रमांची नोंद केली आहे.
गंभीरला मुख्य प्रशिक्षकपदी विराजमान होऊन केवळ पाच महिने झाले आहेत, मात्र या काळात त्याच्या देखरेखीखाली संघाची कामगिरी घसरत चालली असल्याचे दिसत आहे. यामुळे गंभीरच्या अडचणी वाढणार आहेत. कारण भारत पुढील कसोटी मालिका ऑस्ट्रेलियात खेळणार आहे, जिथे त्यांच्यासाठी परिस्थिती आणखी वाईट होणार आहे. या लेखात मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीरच्या नावावर झालेल्या तीन नकोशा विक्रमांबद्दल सांगणार आहोत.
24 वर्षांनी घरच्या मालिकेत क्लीन स्वीप
गौतम गंभीरच्या देखरेखीखाली भारतीय संघाला घरच्या मैदानावर क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने तीन सामन्यांची कसोटी मालिका 3-0 ने जिंकली. टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील संघाने 36 वर्षांनंतर भारतातील पहिली कसोटीही जिंकली. यापूर्वी 2000 मध्ये भारतीय संघाला क्लीन स्वीपचा सामना करावा लागला होता. 2000 साली दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा 2-0 असा पराभव केला होता.
12 वर्षांनंतर मायदेशात मालिका गमावली
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाने घरच्या मैदानावर गेल्या 12 वर्षांत एकही कसोटी मालिका गमावली नव्हती. पण न्यूझीलंड संघाने हा ट्रेंड मोडला आणि सलग तीन सामने जिंकून हा विक्रम मोडीत काढला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने मायदेशात केवळ दोनच सामने गमावले होते. शेवटच्या वेळी 2012 मध्ये भारताने मायदेशात कसोटी मालिका गमावली होती, तेव्हा ऍलिस्टर कुकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2-1 ने विजय मिळवला होता.
दोन दशकांनंतर श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका गमावली
यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतही भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीरची ही पहिलीच मालिका होती. श्रीलंकेने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव केला होता. 27 वर्षात श्रीलंकेविरुद्ध भारताचा हा पहिला वनडे मालिका पराभव ठरला. पहिला सामना अनिर्णित राहिला, त्यानंतर श्रीलंका संघाने पुढील 2 सामने जिंकले.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित आणि विराटने निवृत्त व्हावे; न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर नेटकऱ्यांनी केले ट्रोल
वानखेडे कसोटीतील पराभवानंतर रोहितच्या नेतृत्त्वावर ‘डाग’, न्यूझीलंडने विक्रमांचा रचला ढीग
IND vs NZ; पराभवानंतर कर्णधाराचे मोठे वक्तव्य! म्हणाला, “आम्ही आमचे सर्वोत्तम…”