भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीर दिल्लीतून लोकसभेचा खासदार आहे. खासदार असून देखील गंभीर क्रिकेटच्या मैदानात समालोचन करताना दिसतो. आयपीएल २०२२मध्ये तो लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर होता. लोकप्रतिनिधी असून देखील गंभीर समालोचन करून पैसे कमावतो, यामुळे त्याच्यावर अनेकदा टीका होत असते. याच टीकांना त्याने आता एका पत्रकार परिषदेत उत्तर दिले आहे.
एका राजकीय पत्रकार परिषदेत बोलताना गंभीरला खासदार असून समालोचन करण्याविषयी प्रश्न विचारला गेला. या प्रश्नावर त्याने क्षणाचाही विलंब न करता चोख उत्तर दिले. पत्रकार परिषदेत गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला की, तो गरिबांसाठी भोजनालय चालवतो, जो त्याचा वैयक्तिक खर्च आहे. या योजनेसाठी गंभीर खासदार निधीचा वापर करत नाही. अशात जर गरिबांसाठी पैसा खर्च करायचा असेल, तर त्याला काम करावे लागेल.
गंभीर म्हणाला की, “एका महिन्यात ५००० लोकांना जेवण देण्यासाठी २५ लाख रूपये लागतात. वर्षाचे झाले २.७५ कोटी रुपये. २५ लाख रुपये मला ती लायब्रेरी बनवण्यासाठी लागले आहेत. हे सर्व खासदार निधीतून बनले नाहीये. खासदार निधीतून ५००० लोकांची चूल पेटत नाहीये. या लोकांना खाऊ घालण्यासाठी आणि लायब्रेरी बनवण्यासाठी मला काम करणे भाग आहे. मला हे सांगायला कसलीच लाज वाटत नाही की, होय मी समालोचन करतो किंवा आयपीएलमध्ये काम करतो. परंतु यामागे एक खूप मोठे उद्दिष्ट आहे.”
खासदार झाल्यानंतर गंभीरने या सार्वजनिक भोजनालयाला सुरुवात केली होती. याठिकाणी गरिबांसाठी एका रुपयामध्ये जेवण उपलब्ध करून दिले जाते. गंभीरच्या मतदारसंघात ठिकठिकाणी अशा भोजनालयांची सोय केली गेली आहे. दरम्यान, आयपीएल २०२२मध्ये गंभीरच्या मार्गदर्शनात लखनऊने उत्कृष्ट प्रदर्शन केले. पदार्पणाच्या हंगामात लखनऊ संघाने प्लेऑफपर्यंतचा प्रवास पार केला. संघाची ही कामगिरी खरोखर कौतुकास्पद म्हणावी लागेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मॅक्सवेलने केला करिअरमधील सर्वात मोठ्या चुकीचा खुलासा; म्हणाला, ‘वेळ वाया घालवला, माझ्या प्रतिभेला…’
पाहावे ते नवलंच! पहिल्यांदाच क्रिकेटच्या इतिहासात पाहायला मिळाला भन्नाट शॉट, समालोचकही पडले कोड्यात
नदालने १४व्यांदा मारली French Openच्या फायनलमध्ये धडक, तरीही का झाला निराश?, कारण खूपच धक्कादायक