टी20 विश्वचषकानंतर टीम इंडियाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) नवीन मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. बीसीसीआयनं 13 मे रोजी नवीन मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे होती.
अनेक रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचं नाव मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाइट रायडर्सनं आयपीएल 2024 चं विजेतेपद पटकावलं होतं. सामना संपल्यानंतर गौतम गंभीर आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यात चर्चाही झाली होती. गंभीरचं नाव जवळपास फायनल झालं असून बीसीसीआयकडून त्याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते, असं बोललं जात आहे.
आता गौतम गंभीरनंही मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. गंभीर म्हणाला की, भारतीय संघाला प्रशिक्षण देण्यापेक्षा मोठा सन्मान नाही. अबुधाबीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान गंभीर म्हणाला, “मला भारतीय संघाचा प्रशिक्षक बनायला आवडेल. तुमच्या राष्ट्रीय संघाला (म्हणजेच भारतीय संघाला) प्रशिक्षण देण्यापेक्षा मोठा सन्मान नाही.”
गंभीर पुढे म्हणाला, “तुम्ही 140 कोटी भारतीयांचं प्रतिनिधित्व करत आहात. जेव्हा तुम्ही भारताचं प्रतिनिधित्व करता तेव्हा त्यापेक्षा मोठं काय असू शकतं. मी भारताला विश्वचषक जिंकण्यास मदत करणार नाही, तर 140 कोटी भारतीयच भारताला विश्वचषक जिंकण्यास मदत करतील.”
गौतम गंभीरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
गौतम गंभीरनं 4 डिसेंबर 2018 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानं भारतासाठी शेवटची कसोटी 2016 मध्ये राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. गंभीरनं भारतासाठी 58 कसोटी सामन्यांमध्ये 41.95 च्या सरासरीनं 4154 धावा केल्या, ज्यात 9 शतकांचा समावेश आहे.
गौतम गंभीरनं 147 एकदिवसीय सामन्यांमध्ये 39.68 च्या सरासरीनं 5238 धावा केल्या आहेत. यामध्ये 2011 च्या विश्वचषक फायनलमध्ये खेळलेल्या 97 धावांच्या संस्मरणीय खेळीचाही समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 11 शतकी खेळी खेळल्या आहेत. गंभीरनं टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही आपली छाप सोडली. त्यानं 37 सामन्यात 7 अर्धशतकांच्या मदतीने 932 धावा केल्या, ज्यात त्याची सरासरी 27.41 होती.
महत्त्वाच्या बातम्या –
केकेआरला चॅम्पियन बनवणाऱ्या अय्यरचं झालं लग्न! सोशल मीडियावर फोटो व्हायरल
वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात मिळवून दिला एकहाती विजय! जाणून घ्या कोण आहे ॲरॉन जोन्स