केपटाऊनच्या (Cape town) मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटी सामना सुरू आहे. या सामना सध्या रोमांचक स्थितीत आहे. कारण, जो संघ हा सामना जिंकणार त्याला मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे कुठलाच संघ मागे पडताना दिसून येत नाहीये. तिसऱ्या दिवसाच्या (१३ जानेवारी) समाप्तीपर्यंत दोन्ही संघ बरोबरीत आहे. दरम्यान, याच सामन्यात असे काही घडले ज्यावरून माजी भारतीय दिग्गजाने जोरदार टीका केली आहे. (Sa vs Ind 3rd test)
नेमकं काय घडलं?
तर झाले असे की, दुसऱ्या डावातील २१ वे षटक टाकण्यासाठी आर अश्विन (R Ashwin) गोलंदाजीला आला होता. आर अश्विनने टाकलेला चेंडू डीन एल्गरच्या पॅडला (Dean Elgar) जाऊन लागला. त्यावेळी सर्व खेळाडूंनी पंचांकडे जोरदार मागणी केली होती. पंच इरासमस यांनी देखील त्याला बाद घोषित केले होते. त्यावेळी डीन एल्गरने डीआरएसची मागणी केली होती.
डीआरएस घेतला असता चेंडू यष्टीच्या वरून जात असल्याचे दिसून आले. जे पाहून भारतीय खेळाडू भलतेच नाराज झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पंचांना आपला निर्णय बदलावा लागला. हे सर्व घडल्यानंतर कर्णधार कोहलीने (Virat Kohli) स्टंप माईकमध्ये खरे खोटे सुनावले होते.
दरम्यान, भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir statement) याने विराट कोहलीच्या या वागण्यावर जोरदार टीका केली आहे. त्याने समालोचन करत असताना विराट कोहलीवर टीका करत म्हटले की, “हा विराट कोहलीचा बालिशपणा आहे. तो गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाचे नेतृत्व करतोय. सामन्याचा निकाल काहीही असो परंतु, एका खेळाडूने असे कृत्य करू नये. तो इतका अनुभवी खेळाडू आहे, त्याने केलेल्या या कृत्याचे समर्थन करत येणार नाही.”
अधिक वाचा – राडाच राडा! ‘त्या’ घटनेनंतर विराटसह भारतीय खेळाडूंनी स्टंप माईकमधून ब्रॉडकास्टरवर काढला राग
तसेच तो पुढे म्हणाला की, “अनेक युवा खेळाडू त्याला आदर्श मानतात, परंतु मला नाही वाटत की, कोणालाही त्याच्याकडून ही गोष्ट शिकायला आवडेल. ज्यावेळी पंचांनी त्याला बाद घोषित केलं त्यावेळी तुम्ही उगाच तंत्रज्ञानावर संताप व्यक्त करत होते. मला तर वाटते की, राहुल द्रविड नक्कीच या विषयावर विराट कोहलीसोबत चर्चा करतील. कारण ते जेव्हा कर्णधार होते, त्यावेळी त्यांनी असे काही कृत्य केले नव्हते.”
व्हिडिओ पाहा – वादापासून आयुष्यभर चार हात लांब राहिलेला Rahul Dravid जेव्हा क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात गेला होता
भारतीय संघाने या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघासमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान दिले आहे. दुसऱ्या डावात देखील भारतीय फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. त्यावेळी रिषभ पंतच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २०० पेक्षा अधिक धावांचे आव्हान देण्यात यश आले. दक्षिण आफ्रिका संघाने आतापर्यंत २ बाद १०१ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिका संघाला हा सामना जिंकण्यासाठी आणखी १११ धावा करायच्या आहेत. तर भारतीय संघाला ८ गडी बाद करायचे आहेत.
महत्वाच्या बातम्या :
पहिल्याच मालिकेत विक्रमवीर ठरला प्रतिभावंत जेन्सन; रबाडाने केली कमाल
…आणि बुमराहला बाद करताच १४५ वर्षांत न झालेला पराक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावे झाला जमा; वाचा सविस्तर
हे नक्की पाहा :