Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पहिल्याच मालिकेत विक्रमवीर ठरला प्रतिभावंत जेन्सन; रबाडाने केली कमाल

January 14, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या, भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
jemsen-rabada

Photo Courtesy: Twitter/ICC


भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सध्या तीन सामन्याची कसोटी मालिका (sa vs ind test series) खेळली जात आहे. मालिकेतील पहिले दोन सामना खेळले गेले आहेत आणि दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीवर आहेत. पहिल्या सामन्यापासून दक्षिण अफ्रिकेतील परिस्थिती वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरल्याचे दिसले. दक्षिण आफ्रिकेच्या कगिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि मार्को जेन्सन (Marco Jansen) यांनी अप्रतिम गोलंदाजी करत स्वतःच्या संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. या प्रदर्शनाच्या जोरावर त्यांनी दक्षिण अफ्रिकेच्या दिग्गजांच्या यादीत स्थान देखील बनवले.

दक्षिण अफ्रिकेसाठी या कसोटी मालिकेतील तीन सामन्यांमध्ये कागिसो रबाडा आणि मार्को जेन्सन सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज ठरले. रबाडाने या तीन सामन्यांच्या सहा डावामध्ये २० विकेट्स घेतल्या, तर जेन्सनने या तीन सामन्यांतील सहा डावांमध्ये १९ विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्यांची सरासरी अनुक्रमे १९.५ आणि १६.४७ होती. ही कामगिरी मार्को जोन्ससाठी खास ठरली आहे.

मार्को जेन्सन दक्षिण अफ्रिकेचा एक युवा गोलंदाज आहे आणि त्याने या मालिकेतून स्वतःचे कसोटी पदार्पण केले आहे. दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामना सेंचुरियनमध्ये खेळला गेला होता आणि यामध्ये जेन्सनने त्याचे कसोटी पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या डावात जेन्सनने एक, तर दुसऱ्या डावात चार विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर जोहान्सबर्गमधील दुसऱ्या सामन्यात त्याने एकूण सात विकेट्स घेतल्या. तिसरा कसोटी सामना केप टाऊनमध्ये खेळला गेला आणि यामध्ये जेन्सनने पुन्हा एकदा सात विकेट्स घेतल्या. पदार्पणाच्या कसोटी मालिकेत मार्को जेन्सनने केलेले हे प्रदर्शन खरोखरच कौतुकास्पद म्हणावे लागेल.

कागिसो रबाडा दक्षिण अफ्रिकेचा एक अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. त्याने सेंचुरियनमधील पहिल्या कसोटीत सामन्यात सात विकेट्स घेतल्या होत्या. जोहान्सबर्गमधील दुसऱ्या कसोटीत रबाडाने सहा विकेट्स नावावर केल्या. त्यानंतर केपटाऊनमधील तिसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावांत त्याने एकूण सात विकेट्स घेतल्या.

या कामगिरीनंतर हे दोघे दक्षिण अफ्रिकेच्या दिग्गज गोलंदाजांमध्ये सामील झाले आहेत, ज्यांना भारताविरुद्ध खेळलेल्या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या. दक्षिण अफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने भारताविरुद्ध २०१०-११ मध्ये खेळलेल्या कसोटी मालिकेत २१ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ऍलन डोनाल्ड आहेत, त्यांनी १९९२-९३ मध्ये भारताविरुद्ध कसोटी मालिकेत २० विकेट्स घेतल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा डोनाल्ड यांचे नाव आहे. १९९६-९७ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध मालिकेत २० विकेट्स घेतल्या होत्या.  आता या यादीत चौथ्या क्रमांकावर कगिसो रबाडा पोहचला आहे, तसेच, पाचव्या क्रमांकावर मार्को जेन्सनने स्थान बनवले आहे.

दरम्यान, भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात ११३ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र भारताला सात विकेट्सने पराभव मिळाला आणि मालिकाही बरोबरीवर आली. आता तिसऱ्या कसोटीत दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. भारताने या सामन्यात विजय मिळवला, तर दक्षिण अफ्रिकेच्या धरतीवर संघ पहिल्यांदाज कसोटी मालिका जिंकेल.

महत्वाच्या बातम्या –

SAvsIND, 3rd Test, Live: रिषभ पंतचा शतकी दणका; भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान

आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या वेळापत्रकात झाला बदल, जाणून घ्या कारण

आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या वेळापत्रकात झाला बदल, जाणून घ्या कारण

व्हिडिओ पाहा –


Next Post
BUTLLER STOKES

आयपीएलमध्ये नाही दिसणार इंग्लिश खेळाडू?

virat cover drive

विराटची 'कासवगती'! कर्णधार म्हणून नकोसा विक्रम केला नावावर

Virat Kohli

राडाच राडा! 'त्या' घटनेनंतर विराटसह भारतीय खेळाडूंनी स्टंप माईकमधून ब्रॉडकास्टरवर काढला राग

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143