कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चे आयोजन संयुक्त अरब अमिराती (युएई)मध्ये करण्यात आले आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान खेळण्यात येणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी बीसीसीआयने अनेक दक्षता घेत नियम बनवले आहेत. ही पूर्ण टूर्नामेंट जैव सुरक्षित वातावरणात खेळली जाणार आहे. अशात माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने जैव सुरक्षित वातावरणाविषयी मोठे विधान केले आहे. Gautam Gambhir Talks About Bio-Bubble Rules Of IPL 2020
गंभीर म्हणाला की, “मला नाही वाटत की खेळाडू कोरोना व्हायरसला घाबरतील. जैव सुरक्षित वातावरणात राहणे आणि बीसीसीआयच्या दिशानिर्देशांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. फक्त एका व्यक्तिमुळे टूर्नामेंटचे बलिदान नाही करता येऊ शकत. यासाठी बीसीसीआयने ठरवलेल्या सर्व नियमांचे खेळाडूंनी काटेकोर पालन करावे.”
“आयपीएल ही एक अशी टूर्नामेंट आहे, ज्यामध्ये कोणताही संघ इतर संघाला पराभूत करु शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही आयपीएलची सुरुवात कशाप्रकारे करता? याव्यतिरिक्त भारतीय खेळाडूंनी गेल्या ६ महिन्यांपासून कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळलेले नाही. त्यामुळे दरम्यान कुणाचे प्रदर्शन बिघडले का सुधारले, हे एकदा आयपीएलची सुरुवात झाल्यावरच कळेल,” असे पुढे बोलताना गंभीरने सांगितले.
तसेच, यावर्षी आयपीएलचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाविषयीदेखील गंभीरने वक्यव्य केले. तो म्हणाला की, “आयपीएल २०२०मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचे दिसत आहे. ७ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर दिल्लीने श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली आयपीएल २०१९ला प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते.”
“रिकी पाँटिंगच्या प्रशिक्षणाखाली नक्कीच या संघाच्या प्रदर्शनात बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. अशात आता आयपीएलच्या १३व्या हंगामात दिल्ली संघ विजेतेपद जिंकण्याची क्षमता राखतो. कारण संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी फळी दोन्हीही मजबूत आहे. तसेच संघाकडे युवा खेळाडूंसह अनुभवी खेळाडूदेखील आहेत, जे संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतात,” असे पुढे बोलताना गंभीरने म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
-राजस्थान रॉयल्सची चिंता वाढली; हा स्टार खेळाडू झालाय दुखापतग्रस्त
-चेन्नई सुपर किंग्सने रैनाच्या जागी इंग्लंडच्या डेव्हिड मलानला संघात स्थान देण्यास दिला नकार, कारण…
-माजी क्रिकेटरने सांगितले आयपीएल २०२०च्या विजेत्या संघाचे नाव, पहा रोहित-धोनी का तिसरचं…
ट्रेंडिंग लेख-
-आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या नाकी नऊ आणण्यासाठी कार्तिक निवडेल ‘या’ ११ शिलेदारांना
-अजूनही आयपीएल खेळत असते तर, हे ५ परदेशी खेळाडू झाले असते सुपर डुपर हिट
-या ३ कारणांमुळे आयपीएल २०२० चॅम्पियन बनणार किंग्ज इलेव्हन पंजाब संघ?